शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातचा तीळ अन् सेंद्रिय गूळ संक्रांत करणार ‘गोड’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 17:25 IST

संक्रांतीनंतर तिळाचे दर आणखी उतरण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर : गुजरातचा तीळ अन् सेंद्रिय गूळ यांचे दर सध्या स्थीर असल्याने, तसेच भविष्यातही दर वाढण्याची शक्यता नसल्याने, यंदाची संक्रांत गोड होणार आहे. संक्रांतीनंतर तिळाचे दर आणखी उतरण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.संक्रांतीला तीळ आणि गूळ याची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. त्याला मागणीही जास्त असते. त्यामुळेच मागणी वाढली की दर वाढतात, परंतु यंदा मात्र दरवाढ होण्याची शक्यता दिसत नाही. गुजरात, बार्शी येथून मोठ्या प्रमाणात तीळ बाजारात आला आहे. गूळ उत्पादनही चांगले आहे. त्यामुळे मागणी वाढली, तरी आवकही वाढली असल्याने दर स्थीर आहेत. त्यामुळे यंदा तीळ, गुळाचे दर वाढणार नाहीत, असा व्यापाऱ्यांचा दावा आहे.

गुजराती तीळ २०० रुपये किलोबाजारात तीळ १४० रुपये किलो होते. काही महिन्यापूर्वी हा दर २०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तो सध्या स्थीर आहे. संक्रांत झाल्यानंतर पुन्हा २५ रुपयांनी दर कमी होणार असल्याचे सांगण्यात येते.

सेंद्रिय गूळ ९० रुपयांवरघाऊक बाजारपेठेत सर्वसाधारण गुळाचे दर ३३ ते ४४ रुपये किलो आहेत, तर किरकोळ बाजारपेठेत तोच गूळ ५० रुपये किलो आहे. सेंद्रिय म्हणून विकला जाणारा गूळ मात्र ९० रुपये किलो आहे.

साखरही ४० रुपयांवरसाखरेचे दर गेल्या दीड वर्षापासून स्थीर आहेत. किरकोळ बाजारात साखरेचा किलोचा दर ३८ ते ४० रुपये आहे.

शेतकऱ्यांची तिळाकडे पाठमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तीळ उत्पादन घेण्याकडे पाठ फिरविली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे तीळ उत्पादन कमी झाले. त्यामुळे बाजारपेठेत गुजरातहून तिळाची मोठी आवक सुरू आहे.

उत्पादन वाढले असल्याने गुळाचे दर स्थीर आहेत. साखरेपेक्षा गुळाचे दर हे २००रुपयांनी जास्तच असतील. - नीलेश पटेल, अध्यक्ष गूळ व्यापारी असोसिएशन

संक्रांतीला लागणारा गूळ गुजरात, कोकण येथून मागविण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथेही गुळाचे उत्पादन मोठे झाले आहे. त्यामुळे गुळाचे दर वाढण्याची शक्यता नाही. - निमेश वेद, गूळ व्यापारी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी