शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

राष्ट्रपती रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर, वाहतूक मार्गात बदल, कोणते मार्ग सुरु-बंद राहणार..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 17:25 IST

कोल्हापूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रविवारी (दि २८) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यामुळे काही मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात ...

कोल्हापूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रविवारी (दि २८) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यामुळे काही मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याअनुशंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी वाहतूक नियमन निर्देश व आदेश जारी केले.कोल्हापूर विमानतळ, श्री अंबाबाई दर्शन, सर्कीट हाऊस, ताराराणी चौक, तावडे हॉटेल ते वारणानगर कोडोली अन् परत कोल्हापूर विमानतळ या मार्गावरुन राष्ट्रपतींचा ताफा मार्गक्रमण करणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.या मार्गावर वन वे दुर्गा सिग्नल चौक ते खाँसाब पुतळा चौकखरी कॉर्नर ते मिरजकर तिकटीबिनखांबी ते खरी कॉर्नरमिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर 

वळविण्यात आलेले मार्ग बोरपाडळे हॉटेल येथुन कोडोली, वारणेच्या दिशेने येणारी सर्व प्रकारची वाहतुक कोल्हापूरच्या दिशेने वळविण्यात येईल.शहापुर माले फाटा येथुन वारणेच्या दिशेने जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही माले गावाकडे किंवा यु टर्न घेवुन बोरपाडळेकडे वळविण्यात येईल. कोडोली पोलीस ठाण्यासमोरील पोखले फाटा येथे वारणेच्या दिशेने कोणत्याही प्रकारची वाहतुक सोडली जाणार नाही. त्यांना पोखले गावाकडे वळविले जाईल. किंवा यु टर्न घेवुन बोरपाडळेकडे वळविण्यात येईल.वारणा तालीम येथील बॅरीकेटींग पासुन एकही वाहन पुढे सोडले जाणार नाही.माले गाव, दानेवाडी फाटा, प्लामाक फाटा,  म्हसोबा देवालय येथून कोडोलीच्या दिशेने एकही वाहन सोडले जाणार नाही.

बंद मार्ग :राष्ट्रपती महोदय यांचा कॉनव्हॉय विमानतळ येथुन महालक्ष्मीकडे रवाना होताना एचएसपी ऑफिस समोर पुण्याच्या दिशेने जाणारी आणि अथायु हॉस्पिटलच्या समोर कागलच्या दिशेने जाणारी पुणे बेंगलोर एनएच- ४ महामार्गाची वाहतुक काही काळ थांबविण्यात येईल.कॉनव्हॉय सर्कीट हाऊस येथुन तावडे हॉटेल मार्गे वाठार ब्रिज येथुन वारणा नगर करीता रवाना होताना लक्ष्मी टेकडी, एचएसपी ऑफिस, हॉटेल स्टायलँड, उंचगाव रेल्वचे ब्रिज येथे काही काळ पुणे-बेंगलोर एनएच-४ महामार्गाची पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतुक काही काळ थांबविण्यात येईल. तसेच पुणे बेंगलोर एनएच-४ महामार्गावरील कागलकडे जाणारी वाहतुक ही किणी टोल नाका, शेर-ए-पंजाब धाबा समोर काही काळ थांबवली जाईल.वारणानगर वाठार ब्रिज मार्गे विमानतळाकडे जाताना पुणे-बेंगलोर एनएच-४ हायवेवरील कागलच्या दिशेने जाणारी वाहतुक किणी टोल नाका, शेर-ए-पंजाब धाबा, नागाव फाटा, सांगली फाटा ओव्हर ब्रिज, पंचगंगा ब्रिज येथे काही काळ थांबविण्यात येईल. तसेच पुणे बेंगलोर एनएच-४ महामार्ग वरील पुण्याकडे जाणारी वाहतुक ही लक्ष्मी टेकडी, एचएसपी ऑफिस समोर काही काळ थांबवली जाईल. वारणानगरकडे जाताना आणि वारणानगरकडुन विमानतळकडे येताना यादरम्यान पुणे बेंगलोर, एनएच-४ हायवेवर असणा-या सर्व वाहनांनी महामार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करावा. वारणानगर येथील पार्किंगची सोय :वारणानगर येथे होणा-या कार्यक्रमाकरीता वारणा साखर कारखाना गाडी अड्डा येथे पार्कींगची सोय करण्यात आली आहे. या पार्कीगकरीता येणारी वाहने सकाळी १० वाजण्यापुर्वीच येतील. यानंतर वाठार ते वारणानगर आणि कोडोली ते वारणानगर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. राष्ट्रपती महोदयांचा कॉनव्हॉय विमानतळ ते श्री अंबाबाई मंदिर ते सर्किट हाऊस ते वारणानगर ते विमानतळ या दरम्यान येताना आणि जाताना संपुर्ण कॉनव्हॉय मार्गावर महोदयांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन आवश्यकतेनुसार वाहतुक चालु बंद करण्यात येईल.

नो पार्किंग झोन :विमानतळ ते शाहु टोल नाकाशाहु टोल नाका ते केएसबीपी चौक ते ताराराणी चौक (रस्त्याच्या दोन्ही लेन)ताराराणी चौक ते धैर्यप्रसाद चौक (रस्त्याच्या दोन्ही लेन)धैर्यप्रसाद चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय चौक (रस्त्याच्या दोन्ही लेन) जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते दसरा चौक ते बिंदु चौकबिंदु चौक ते मिरजकर तिकटी ते खरी कॉर्नर ते श्री अंबाबाई मंदिरधैर्यप्रसाद चौक ते सर्किट हाऊसताराराणी चौक ते तावडे हॉटेलहे निर्देश राष्ट्रपतींचा दौरा सुरु होवुन संपेपर्यंत फक्त कॉनव्हॉयमधील वाहनांकरीता ये-जा करण्याच्या कालावधीत एकेरी मार्ग शिथिल करण्यात येत आहेत. याशिवाय आवश्यकतेनुसार महामार्गावरील वाहतुक तसेच कोल्हापूर शहरातील इतर रस्ते, चौक याठिकाणची वाहतुक सुरु बंद करणे अगर वाहतुक वळविण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPresidentराष्ट्राध्यक्षTrafficवाहतूक कोंडी