शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कोल्हापुरात वाघांचं दर्शन झाल _ उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 1:40 AM

कोल्हापूर : सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात फिरतोय. लोकांशी बोलतोय.

ठळक मुद्देशिवसैनिकांच्या जल्लोषाने भारावले; गरजूंना ई-रिक्षांचे वितरणंहिंदुुत्वाचे अभूतपूर्व दर्शन घडतंय.वाघांचं दर्शन झालं,

कोल्हापूर : सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात फिरतोय. लोकांशी बोलतोय. शिवसैनिकांशी भेटतोय. तोच जिवंतपणा, तोच रसरशीतपणा आणि तेच ज्वलंत हिंदुत्व ठासून भरल्याचं आजही पाहायला मिळाले. इथे मला साक्षात वाघांचं दर्शन झालं, अशा कृतार्थ भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री कोल्हापुरात व्यक्त केल्या.

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणिवेतून गरीब महिला, अपंग व्यक्ती यांना ई-रिक्षा वाटपाचा कार्यक्रम ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी रात्री दहा वाजता पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी १०० पैकी २७ जणांना प्रत्यक्ष कागदपत्रे देण्यात आली.

सोन्यामारुती चौकापासून आमदार क्षीरसागर यांच्या निवास्थानापर्यंत ठाकरे यांच्या स्वागतार्थ झालेली फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, पक्षप्रमुखांचा जयघोष, घोषणाबाजी आणि शिवसैनिकांचा उत्साह पाहून उद्धव ठाकरे अक्षरश: भारावून गेले. व्यासपीठावर येऊन ठाकरे यांनी कोणतीही औपचारिकता न बाळगता थेट बोलायलाच सुरुवात केली आणि कोल्हापूरकरांबद्दलच्या मनातील भावना शब्दांत व्यक्त केल्या.

सकाळपासून अनेक ठिकाणी सभा झाल्या. लोकांशी भेटतोय, संवाद साधतोय. मला या ठिकाणी जिवंतपणा, रसरशीतपणा आणि ज्वलंत हिंदुुत्वाचे अभूतपूर्व दर्शन घडतंय.वाघांचं दर्शन झालं, असे सांगत ठाकरे म्हणाले की, राजेशचा वाढदिवस आज आहे, हे मला माहीत नव्हते. माझा दौरा आणि वाढदिवस हा योगायोग आहे. वाढदिवस प्रत्येकाचे होत असतात; परंतु सामाजिक जाणिवेतून जनतेच्या उपयोगाची कामे करण्याचे भान राजेश यांनी ठेवले.

गरिबांना त्यांनी ई-रिक्षांचे वाटप केले. ई-रिक्षा म्हणजे काय भानगड आहे, असा मला प्रश्न पडला; कारण या सरकारची शेतीसुद्धा आता आॅनलाईन आहे; पण येथे आल्यावर कळले, दिल्लीसारख्या शहरात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे; पण कोल्हापुरात पर्यावरणाचा प्रश्नच निर्माण होऊ नये म्हणून ई-रिक्षा वाटल्या जात आहेत. आमचा शिवसैनिक सरकारच्याही दोनच नाही तर कितीतरी पावले पुढे आहे, हे आज स्पष्ट झाले.

राजेश, तुम्ही अशीच जनतेची कामे करीत राहा. तुमच्या कारकिर्दीला माझ्या शुभेच्छा आहेतच. शिवसेना आपल्या पाठीशी आहे, अशा शब्दांत आमदार क्षीरसागर यांचे ठाकरे यांनी अभिनंदन केले.यावेळी महापौर हसिना फरास, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार विनायक राऊत, खासदार गजानन कीर्तिकर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, नगरसेवक नियाज खान, राहुल चव्हाण, अभिजित चव्हाण, प्रतिज्ञा उत्तुरे-निल्ले उपस्थित होत्या.कोल्हापुरातील शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर याच्या वाढदिवसानिमित्त गरीब महिला, अपंग व्यक्तींना ई-रिक्षांचे वाटप शुक्रवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले.यावेळी मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, अरुण दुधवडकर, आमदार राजेश क्षीरसागर, महापौर हसिना फरास, खासदार विनायक राऊत उपस्थित होते.