शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुढील आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना सज्ज करा : गणेश देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 16:39 IST

मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिनानिमित्त आयोजित पारितोषिक वितरण समारंभ आणि माजी विद्यार्थी मेळाव्यात पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख बोलत होते.

ठळक मुद्देपुढील आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना सज्ज करा : गणेश देशमुखमेन राजाराम हायस्कूलमध्ये विद्यार्थी, शिक्षकांचा सन्मान : माजी विद्यार्थ्यांचे संयोजन

कोल्हापूर : पुढील आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना सज्ज करणे आपले कर्तव्य आहे, अशा शब्दांत मेन राजाराम हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले.मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिनानिमित्त आयोजित पारितोषिक वितरण समारंभ आणि माजी विद्यार्थी मेळाव्यात देशमुख बोलत होते.

यावेळी माजी विद्यार्थ्यांमार्फत उपस्थित आजी-माजी शिक्षकांचा पुस्तक आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देणगीदारांच्या ठेवनिधीतून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले; तसेच शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पाटील आणि प्रभारी प्राचार्य अशोकराव देशमुख होते.

यावेळी देशमुुख यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगून शाळेस सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. डॉ. पाटील यांनीही शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.

यावेळी माजी विद्यार्थी बाजीराव माणगावे, संध्या शिंदे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. सुप्रिया पोवार आणि शिवानी पाटील या पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांनीही त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्वांचे आभार मानले. प्रवीण चव्हाण, सखाराम भोसले, नितीन काकडे आणि संजय खराडे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.प्राचार्य अशोकराव देशमुख यांनी प्रास्तविक केले. पाहुण्यांची ओळख व्ही. बी. डोणे यांनी करून दिली, तर ए. एस. देवकर यांनी आभार मानले. बी. पी. माळवे आणि जी. व्ही. खाडे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सदस्य, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे सदस्य, किशोरी उत्कर्ष मंच व मेन राजाराम हायस्कूलच्या शिक्षक-पालक संघाचे सदस्य उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनkolhapurकोल्हापूरGanesh Deshmukhगणेश देशमुख