शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जोतिबा चैत्र यात्रेची युद्धपातळीवर तयारी सुरू, यात्रेचा मुख्य दिवस कधी...जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 16:33 IST

यात्रेसाठी येतात ७ ते ८ लाखापर्यंत भाविक

जोतिबा : डोंगरावर चैत्र यात्रेच्या तयारीची लगबग सुरू झाली असून, वाहन पार्किंगसाठी सपाटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जोतिबा देवाची पाच एप्रिलला चैत्र यात्रा होणार आहे.यात्रेसाठी ७ ते ८ लाखापर्यंत भाविक येतात. अशावेेळी डोंगरावर पार्किंगसाठी जागा अपुरी पडते. यासाठी गेली चार-पाच वर्षे डोंगरावर व परिसरातील जागेचे सपाटीकरण करून वाहनतळ बनविण्यात येते. दोनचाकी, चारचाकी वाहनाची स्वतंत्र व्यवस्था केली जाते. यामुळे यात्रेच्या वेळी होणारी वाहतुकीची कोंडी दूर होते. सध्या जोतिबा येथे शहर वाहतूक शाखेकडून आतापर्यंत १० ठिकाणी पार्किंग सपाटीकरण करण्यात आले असून, यापुढे अंदाजे २२ ते २३ ठिकाणी सपाटीकरण करण्यात येणार आहे. जिथे पार्किंगच्या ठिकाणी रस्ता खराब असेल तेथेदेखील मुरूम टाकून प्रशस्त जागा बनवण्यात येत आहे. सध्या यमाई मंदिर पाठीमागे व नवीन आंब्याचे झाड या ठिकाणी युद्धपातळीवर काम सुरू आहे. यासाठी दोन जेसीबी, दोन ट्रॅक्टर व आवश्यकतेनुसार रोड रोलरचा वापर करण्यात येत आहे.कोल्हापूर शहर वाहतूक शाखेने सपाटीकरणाच्या नियोजनासाठी एक सहायक पोलिस उपनिरीक्षक व एक पोलिस हवालदार नेमण्यात आले आहेत. अंदाजे दोनचाकी वाहन १० ते १२ हजार व चारचाकी अंदाजे १०ते ११ हजार वाहने बसतील असे नियोजन असल्याचे पोलिस हवालदार संदीप निळपणकर यांनी सांगितले. २० मार्चला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी २ वाजता यात्रा नियोजन आढावा बैठक होणार आहे. याच दिवशी दुपारी ४ वाजता सासणकाठीधारक, व्यापारी, गावकरी यांच्यासमवेतही बैठक होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा