शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: नृसिंहवाडीत दत्तजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण, उद्या सायंकाळी होणार दत्तजन्मकाळ सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 18:21 IST

प्रशांत कोडणीकर नृसिंहवाडी: श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून उद्या, मंगळवारी (दि.२६) सायंकाळी ५ वाजता ...

प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी: श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून उद्या, मंगळवारी (दि.२६) सायंकाळी ५ वाजता मुख्य मंदिरात दत्तजन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात, आदी राज्यातून अनेक भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. भाविकांना दर्शनाची सोय व्हावी यासाठी येथील श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देव संस्थान व ग्रामपंचायतमार्फत अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.दत्त मंदिरात उद्या, मंगळवारी पहाटे ४ वाजता काकड आरती व शोडषोपचार पूजा, सकाळी ७ ते १२ यावेळेत पंचामृत अभिषेक, दुपारी १२.३० वाजता श्रींचे चरणकमलावर महापूजा व भाविकांसाठी महाप्रसाद, दुपारी ३ वाजता ब्रह्मवृंदांकडून पवमान पंचसुक्तांचे पठण होईल.दुपारी ४ नंतर श्री नारायणस्वामी महाराजांचे मंदिरातील श्रींची उत्सवमूर्ती सवाद्य मुख्य मंदिरात आणण्यात येईल. त्यानंतर ४.३० वाजता ह.भ.प.कौस्तुभबुवा सरदेसाई रा. रत्नागिरी यांचे सुश्राव्य कीर्तन होऊन सायंकाळी ठिक ५ वाजता दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे. जन्मकाळानंतर पारंपारिक आरती, पाळणा होऊन सुंठवडा प्रसाद वाटप होईल. रात्री ९ नंतर धूप दीप आरती व पालखी सोहळा होवून रात्री उशिरा शेजारती होणार आहे.यासोहळ्यानिमित्त नृसिंहवाडीसाठी जादा एसटी बसेस सोडणेसाठी राज्य परिवहन मंडळ व आवश्यक पोलीस बंदोबस्तासाठी संबधित प्रशासनाशी संपर्क साधण्यात आल्याचे देवस्थानचे अध्यक्ष संतोष खोंबारे, उपसरपंच अमोल विभूते  यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDatta Mandirदत्त मंदिर