शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Flood: स्थलांतरित व्हा, आरामात राहा; महासैनिक दरबार येथे 'सेंट्रल किचन'ची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 14:05 IST

कोल्हा पूर : राधानगरी धरणातून ‘भोगावती’त, दुसरीकडे ‘कोयने’तून कृष्णा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने रात्रीत पाणीपातळी वाढणार आहे. त्यामुळे ...

कोल्हापूर : राधानगरी धरणातून ‘भोगावती’त, दुसरीकडे ‘कोयने’तून कृष्णा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने रात्रीत पाणीपातळी वाढणार आहे. त्यामुळे पूरबाधित भागातील नागरिकांनी दारापर्यंत पूर येण्याची वाट बघू नये, स्थलांतरित व्हा, आरामात राहा, घरात राहिल्यासारखे वाटेल, अशी चांगली सोय करू, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केले.मागील महापुराप्रमाणे यंदाही ‘महासैनिक दरबार हॉल’मध्ये सेंट्रल किचन केले जाणार असून ‘केडीएम’सह, कंपन्या, कारखान्यांना व स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने नागरिकांची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी शहर-जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, घरांमध्ये रात्रीतून पाणी घुसले तर लोकांना बाहेर काढणे अवघड होईल. त्यामुळे प्रशासन सांगेल ते ऐकून सहकार्य करा, वेळेत स्थलांतरित व्हा. तुम्हाला घरात राहिल्यासारखे वाटेल असे सहकार्य करू. आज शनिवारी दुपारी सर्व स्वयंसेवी संस्था, कारखाने, कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करणार आहे. मागील दोन महापुरांप्रमाणे महासैनिक दरबार हॉल येथे सेंट्रल किचन सुरू केले जाईल.

दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी राहिल्यास १० हजार देणारपालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, २८ जुलै २०२३ च्या अधिसूचनेनुसार घरात दोन दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी राहिले असेल तर १० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. तसेच दुकानदार, टपऱ्यांसाठीही मदत केली जाईल. एका दिवसात ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस होऊन घरांची पडझड झाली असेल तरी नुकसानभरपाई दिली जाईल.

पांडुरंगाला प्रार्थनामंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील सर्व धरणे भरली आहे. त्यामुळे आज मी पांडुरंग आणि तुळजाभवानीचे दर्शन घेऊन आलो. पाऊस मनासारखा झाला आहे; पण आता महापूर तेवढा येऊ नये, शेतकऱ्यांचे कल्याण होऊ दे, अशी प्रार्थना केली आहे.

‘अलमट्टी’तून विसर्ग योग्य पद्धतीने‘अलमट्टी’च्या आधी असलेल्या हिप्परगी बंधाऱ्यातून विसर्ग केला जात नाही अशी तक्रार होती; पण कोल्हापुरातून हिप्परगीमध्ये २ लाख आणि तितकाच विसर्ग हिप्परगीतून ‘अलमट्टी’मध्ये होत आहे. अलमट्टीतून ३ लाख क्युसेक विसर्ग सुरू असून तेथे महाराष्ट्रातील एका उपअभियंत्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे शंका दूर झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरHasan Mushrifहसन मुश्रीफ