शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

गणेश विसर्जनाची तयारी; कोल्हापुरात २५०० कर्मचारी तैनात, मिरवणुकीवर सीसीटीव्हीचा वॉच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 14:13 IST

कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता उद्या, मंगळवारी होत असून गणेश मूर्ती विसर्जनाकरिता महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. इराणी खण या ...

कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता उद्या, मंगळवारी होत असून गणेश मूर्ती विसर्जनाकरिता महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. इराणी खण या एकाच ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जन होणार असून महापालिकेचे अडीच हजार कर्मचारी, ३५० हमाल यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते गणेश मूर्ती विसर्जनाकरिता मदत करणार आहेत. इराणी खण व विसर्जन मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.गणेश विसर्जनाच्या तयारीचा महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महापालिकेने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी सर्व अधिकारी उपस्थित होते.इराणी खण येथे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून विसर्जन प्रक्रिया सुलभ आणि जलद व्हावी म्हणून बारा तराफे ठेवण्यात आले आहेत. तराफ्यावर मूर्ती ठेवून त्या पाण्यात विसर्जित केल्या जाणार आहेत. विभागीय कार्यालयांतर्गत गणेश मूर्ती आणण्यासाठी ७० टेम्पो, पाच जे.सी.बी., सात डंपर,चार ट्रॅक्टर, चार पाण्याचे टँकर, दोन बुम, चार क्रेन, सहा ॲम्ब्युलन्स अशी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. इराणी व बाजूच्या खणीभोवती संरक्षणासाठी बॅरिकेडिंग करण्यात येत असून वॉच टॉवर व पोलिसांसाठी पेंडल उभे करण्यात आले आहेत. अग्निशमन विभागामार्फत विसर्जन ठिकाणी अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड आवश्यक त्या साधनसामुग्रीसह तैनात ठेवण्यात येणार आहेत.विसर्जन मार्गावरील धोकादायक इमारती भोवती बॅरिकेड्स उभारण्याच्या तसेच या इमारती धोकादायक असल्याचे फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाने विश्रांती दिल्याने विसर्जन मार्गावरील सर्व खड्ड्यांवर डांबरी पॅचवर्क करण्यात आले आहे. पोलिस प्रशासनाने निश्चित केलेल्या विसर्जन मार्गावर बॅरिकेड्स व वॉच टॉवर उभी करण्यात आली आहेत. मिरवणूक मार्ग व विसर्जन ठिकाणी आवश्यक त्या लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे.गंगावेशीतून पंचगंगा नदीकडे जाणारा मार्ग बंदगत चार वर्षांपासून सार्वजनिक मंडळांनी पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जित न करता इराणी खणीत विसर्जन करण्याचा संकल्प केला आहे. यावर्षी देखील खणीतच गणेश मूर्ती विसर्जित केल्या जाणार आहेत. त्यामुळे गंगावेश येथून पंचगंगा नदीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. नदीच्या परिसरातही बॅरिकेड्स लावली जाणार आहेत.

२,१०० पोलिसांची फौज, लेसरवर होणार कारवाईअनंत चतुर्थीला होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह २,१०० पोलिसांची फौज रस्त्यांवर तैनात असेल. मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी सहा टेहळणी मनोरे तयार केले आहेत. तसेच आदल्या रात्री ध्वनियंत्रणांचे स्ट्रक्चर उभारण्याच्या निमित्ताने रस्ते अडवणारी वाहने जप्त करून मंडळांवर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिला आहे.

पारंपरिकसह पर्यायी मार्गाचीही तयारीबाप्पांच्या विसर्जनासाठी महाद्वारमार्गे क्रशर खणीकडे जाणाऱ्या पारंपरिक विसर्जन मार्गासह सुभाषरोड, हॉकी स्टेडियम, संभाजीनगरमार्गे क्रशर खणीकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गावरूनही मंडळांना विसर्जनासाठी जाता येणार आहे. महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी दोन्ही मार्ग सज्ज ठेवले आहेत.

२१०० पोलिसांची फौजविसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी पोलिसांसह राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल, दंगल काबू पथक आणि होमगार्ड अशी सर्व दले सज्ज झाली आहेत. विसर्जन मार्गासह क्रशर खण आणि शहरातील प्रमुख मार्गांवर २१८९ पोलिस बंदोबस्तासाठी तैनात असतील.

लेसरबंदीची काटेकोर अंमलबजावणीडोळ्यांना घातक ठरणाऱ्या लेसरवर विसर्जन मिरवणुकीत जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. या बंदी आदेशाचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांची लेसर यंत्रणा जप्त करून गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे लेसरचा वापर कोणीही करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.रस्ते अडविणारे रडारवरकाही मंडळे मिरवणुकीपूर्वी रस्त्यात वाहने लावून स्ट्रक्चर उभारणीचे काम करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. अशा मंडळांवर पोलिसांची विशेष नजर राहणार असून, स्ट्रक्चर जप्त करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

उलट्या दिशेने प्रवेशाला बंदीबिनखांबी गणेश मंदिर ते गंगावेश या मार्गावर सायंकाळी सहा ते रात्री बारापर्यंत प्रचंड गर्दी असते. नागरिकांना मिरवणूक व्यवस्थित पाहता यावी, यासाठी उलट्या दिशेने कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. जाणाऱ्या आणि येणाऱ्या नागरिकांसाठी दोन स्वतंत्र मार्ग केले जाणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी बाहेर पडण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे. तसेच विसर्जन मार्गापासून १०० मीटर अंतरात वाहनांना प्रवेशबंदी असेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024