शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात अवकाळी पाऊस, ‘अरबी’ समुद्रात कमी दाबाचा पट्याचा परिणाम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 15:55 IST

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह हलका पाऊस झाला. ‘अरबी’ समुद्र व हिंदी महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वातावरणात बदल झाला असून या पावसाने भाजीपाल्यासह वीटभट्टीचालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. शनिवारपर्यंत ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ठळक मुद्दे कोल्हापुरात अवकाळी पाऊस, ‘अरबी’ समुद्रात कमी दाबाचा पट्याचा परिणाम वीटभट्टीचालकांची तारांबळ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह हलका पाऊस झाला. ‘अरबी’ समुद्र व हिंदी महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वातावरणात बदल झाला असून या पावसाने भाजीपाल्यासह वीटभट्टीचालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. शनिवारपर्यंत ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.यंदा सर्वच ऋतू पुढे सरकलेच्या दिसते. परतीचा पाऊस नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राहिला. पाऊस थांबून आता कुठे थंडीची चाहूल लागली होती. तोपर्यंत सोमवारपासून वातावरणात बदल झाला. सकाळी ढगाळ वातावरणासह आकाश भरून आले होते. सकाळी नऊच्या दरम्यान सुर्यनारायणाचे नुसते दर्शन दिले आणि पुन्हा गायब झाला. दिवसभर आकाशात ढगांची दाटी झाली होती. साधारणत: दुपारी साडेतीनच्या दरम्यान कोल्हापूर शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.अरबी समुद्राच्या दक्षिण भागात आणि विषवृत्ताच्या हिंदी महासागराजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पुढील चार-पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. सोमवारी किमान तापमान २१ तर कमाल २७ डिग्रीपर्यंत राहिले. अचानक ढगाळ वातावरण झाल्याने वीट व्यवसायकांची चांगलीच तारांबळ उडाली. विटा झाकण्यासाठी सोमवारी पहाटेपासून मजुरांची धांदल सुरू होती. या वातावरणाचा मोठा फटका भाजीपाल्याला बसणार आहे.पाऊस पाठ सोडेना!यंदा जुलै-आॅगस्ट महिन्यातील अतिवृष्टी आणि त्यानंतर आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. गेली पंधरा-वीस दिवस पावसाने उसंत घेतली तोपर्यंत पुन्हा पाऊस सुरू झाला.आठ दिवसांतील तापमान डिग्रीमध्ये असे-वार                किमान      कमाल        वातावरणमंगळवार             २१          २७        ढगाळ, तुरळक पाऊसबुधवार                 २१         २९         ढगाळगुरुवार                 १९          ३१        ढगाळशुक्रवार               १८           ३१         ढगाळशनिवार              १८            ३१        ढगाळरविवार               १९            ३१        स्वच्छ 

 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग