कोल्हापूर : बालिंगे (ता. करवीर) येथील सुनील वागवेकर या सुतार कारागिराचा सुपुत्र व बालिंगे हायस्कूलचा विद्यार्थी प्रतीक याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवत खणखणीत यश संपादन केले. विशेष म्हणजे प्रतीक याची बहीण ‘स्नेहल’ हिने यापूर्वी ९५.२० टक्के गुण संपादन केले होते.सुनील वागवेकर यांनी सुतारकाम करून मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिले. वडिलांच्या कष्टाला प्रतीकने मेहनतीने व जिद्दीने बळ देत यश संपादन केले. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत कष्ट घेतले तर यश मिळतेच, आई आणि वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केल्याचे प्रतीकने सांगितले.याशिवाय, शाळेतील जुबेरिया मोमीन हिने ९२.४० टक्के, हर्षवर्धन सूर्यवंशी याने ९१.६० टक्के अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष वसंतराव जांभळे, सहसचिव मधुकर जांभळे, खजानीस अशोक घोडके, सदस्य विशाल जांभळे, एम. एस. भवड, मुख्याध्यापक एच के. पटवेगार यांचे मार्गदर्शन लाभले.
Kolhapur: बालिंगेतील सुतार कारागिराचा मुलगा ठरला यशाचे ‘प्रतीक’, दहावी परीक्षेत मिळवले ९४ टक्के गुण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 14:35 IST