शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

घरात अठरा विश्व दारिद्र्य, तरीही जिद्दीने मिळवली ७७ लाखांची शिष्यवृत्ती; पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 17:52 IST

घरी पाचवीला पुजलेले अठरा विश्व दारिद्र्य, वडील एम.आय.डी.सी. कामगार, अभ्यासाला काही वर्षे विजेअभावी दिव्याच्या प्रकाशाची सोबत पण तरीही प्रतीकने संशोधक होण्याची जिद्द मनी बाळगत मोठ्या परिश्रमाने आपले शिक्षण सुरु ठेवले. अन् प्रतिकच्या या कष्टाचे अखेर चिज झाले.

अनिल पाटीलमुरगूड : घरी पाचवीला पुजलेले अठरा विश्व दारिद्र्य, वडील एम.आय.डी.सी. कामगार, अभ्यासाला काही वर्षे विजेअभावी दिव्याच्या प्रकाशाची सोबत पण तरीही प्रतीकने संशोधक होण्याची जिद्द मनी बाळगत मोठ्या परिश्रमाने आपले शिक्षण सुरु ठेवले. अन् प्रतिकच्या या कष्टाचे अखेर चिज झाले. प्रतिकला परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाची तब्बल ७७ लाख रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली. या शिष्यवृत्तीमुळे प्रतिकच्या पंखांना आणखीन बळ मिळाले.प्रतीक पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात जाणार आहे. त्यासाठी विमान व अन्य खर्चासाठी त्याला दोन लाख रुपये खर्च येणार आहे. हा पैसा कसा उभा करायचा या विविंचनेत प्रतीक व त्याचे कुटुंबीय आहे. त्यामुळे समाजातील दानशूर संस्था आणि व्यक्तींनी प्रतिकच्या गगनभरारीला दातृत्वाचे बळ देणे गरजेचे आहे.कागल तालुक्यातील कुरुकली येथील सर्वसामान्य कुटूंबातील प्रतीक दत्तात्रय कांबळे असे परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळालेल्या जिद्दी तरुणाचे नाव. प्रचंड ध्यास अभ्यासातील प्रगती याच्या जोरावर त्याची ऑस्ट्रेलिया नॅशनल युनिवर्सिटी मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. कुरुकली सारख्या छोट्याश्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रतीकचे पाचवी पर्यंत शिक्षण घेतले. प्रतीकची हुशारी पाहून शिक्षकांनी त्याला नवोदयसाठी प्रोत्साहित केले. त्याची नवोदय विद्यालयामध्ये निवड झाली पुढे १२ वी पर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालयामध्ये घेतले. इचलकरंजी येथे दत्ताजीराव कदम इन्स्टिट्यूट मध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी चांगल्या गुणांनी प्राप्त केली. याच गुणांच्या आधारे त्याची ऑस्ट्रेलिया येथे मास्टर ऑफ इंजिनिअरींग इन मेकोक्ट्रॉनिकस या विषयातील पदव्युत्तर शिक्षणाची संधी मिळाली आहे.

विशेष करून रोबोट तंत्रज्ञानामध्ये त्याचे तेथील शिक्षण व संशोधन होणार असल्याचे त्याने सांगितले. अन्य देशातील विद्यापीठांमध्ये देखील त्याला संधी होती. मात्र प्रतीकने ऑस्ट्रेलिया युनिवर्सिटीची निवड केली. आता या महिन्या अखेरीस प्रतिकला उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला जायचे आहे. यासाठी दीड लाखाचा विमान प्रवास व अन्य खर्चासाठी त्याला सुमारे दोन लाख खर्च अपेक्षित आहे. यासाठी त्याला झुंजावे लागत आहे. समाजातील दातृत्वशील व्यक्तींनी पुढे आल्यास प्रतीकचा हा प्रवास सुकर होऊ शकतो. त्यामुळे एका वंचित उपेक्षित अश्या गुणवंत मुलासाठी आता समाजानेच पुढे येण्याची गरज आहे.

प्रतीकला मदत करण्यासाठीBank-State bank of India  (SBI)Account no.-20296083445CIF no.-88461562267IFSC-SBIN0000270

फोन पे व गुगलपेही करू शकता मदत प्रतीक कांबळेगुगल पे आणि फोन पे साठी नंबर7709155277

टॅग्स :kolhapurकोल्हापूरScholarshipशिष्यवृत्ती