शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिवद्रोही प्रशांत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; जामिनासाठी तातडीने करणार अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 12:31 IST

प्रशांत कोरटकर याला न्यायालयाने आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Prashant Koratkar: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा शिवद्रोही प्रशांत कोरटकर याला न्यायालयाने आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याने आता कोरटकरकडून तातडीने जामिनासाठी अर्ज केला जाण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर पोलिसांनी २४ मार्च रोजी प्रशांत कोरटकर याला ताब्यात घेतल्यानंतर २५ मार्च रोजी त्याला पहिल्यांदा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तेव्हा न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर २८ मार्च रोजी पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आज पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं होतं. यावेळी न्यायालयाने त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

दरम्यान, आक्षेपार्ह वक्तव्य करून राज्यभरातील शिवप्रेमींच्या संतापाचा सामना करत असलेला प्रशांत कोरटकर हा जामिनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती असून त्याच्या जामिनाबाबत न्यायालयाकडून काय निर्णय देण्यात येतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोरटकरची मदत कोणी केली?

प्रशांत कोरटकर हा पसार असण्याच्या काळात त्याने वापरलेल्या कार पोलिसांनी नागपुरातून जप्त केल्या, तसेच १७ ते २४ मार्चच्या दरम्यान त्याला खर्चासाठी दीड लाखाची रोकड कोणी दिली, याचीही माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

कोरटकर याने पसार काळात नागपूर, चंद्रपूर, बैतूल, हैदराबाद (आंध्र प्रदेश), इंदूर आणि करीमनगर (तेलंगणा) येथे वास्तव्य केले. यासह तो वावरलेल्या एकूण १८ ठिकाणांची पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. नागपुरात गेलेल्या पथकाने कोरटकर याची एक आलिशान कार जप्त केली, तसेच त्याचा मित्र मटका बुकी धीरज चौधरी याचीही कार जप्त केली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालयShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज