शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

प्रमोद सावंत यांना कोल्हापुरातून राजकीय बाळकडू -गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी झेप : वैद्यकीय शिक्षण कोल्हापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:03 IST

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्ती होणार आहे. सावंत यांची राजकीय जडणघडण ही कोल्हापुरातून झाली आहे. या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेताना त्यांनी जनरल सेक्रेटरी (जी.एस.)पदी निवडून येऊन आपल्यातील नेतृत्वगुणाची चुणूक दाखविली.

ठळक मुद्देलढविली जी.एस. पदाची पहिली निवडणूक

कोल्हापूर : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्ती होणार आहे. सावंत यांची राजकीय जडणघडण ही कोल्हापुरातून झाली आहे. या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेताना त्यांनी जनरल सेक्रेटरी (जी.एस.)पदी निवडून येऊन आपल्यातील नेतृत्वगुणाची चुणूक दाखविली.गोव्यातील छोट्याशा खेड्यातून आलेल्या सावंत यांचे वडील हे जनसंघाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांच्यावर घरातूनच राजकीय व सामाजिक कार्याचे धडे मिळाले.

बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी गोव्यात घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी सन १९९१ मध्ये ते कोल्हापुरातील रंकाळवेश दुधाळी परिसरातील गंगा आयुर्वेदिक कॉलेजमध्ये दाखल झाले. या काळात ते रंकाळा परिसरात भाड्याने राहिले. त्यांच्यातील नेतृत्वगुण ओळखून मित्रपरिवाराने त्यांना सन १९९२ मध्ये जनरल सेक्रेटरी पदाच्या निवडणुकीसाठी उभे केले. त्यामध्ये ते भरघोस मतांनी विजयी झाले. त्यांच्या आयुष्यातील ही पहिली निवडणूक होती. या निमित्ताने त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. सन १९९७ मध्ये त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले. यावेळी त्यांनी शिवाजी विद्यापीठातून ‘बीएएमएस’ची पदवी घेतली. या काळात त्यांचा अनेकांशी ऋणानुबंध आला. ते अंबाबाईचे निस्सीम भक्त आहेत. दरवर्षी ते नवरात्रात न चुकता अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात तसेच ते आपल्या महाविद्यालयीन मित्रपरिवारालाही आवर्जून भेटतात. गप्पांचा फड रंगतो व जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.

ते सन २०१२ मध्ये पहिल्यांदा साखळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले. त्यावेळी कोल्हापुरातील त्यांच्या सन १९९७ च्या बॅचने त्यांचा सत्कार केला होता. त्यानंतर ते दुसऱ्यांदा विजयी होऊन विधानसभा सभापती झाल्यानंतरही कोल्हापुरात त्यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापुरात आल्यावर ते आवर्जून माझ्या उचगाव येथील निवासस्थानी राहायला यायचे, आमदार असतानाही ते आले होते; परंतु आता राजशिष्टाचारामुळे त्यांना ते शक्य होत नाही; परंतु आमच्या भेटीगाठी होत असतात, असे रणजित सावंत यांनी सांगितले. 

आमचा वर्गमित्र हा गोव्याचा मुख्यमंत्री झाल्याने मनस्वी आनंद झाला आहे. सर्वांत तरुण व मनमिळाऊ असणारे माझे मित्र प्रमोद सावंत मुख्यमंत्री म्हणून नक्कीच चांगले काम करतील, असा विश्वास आहे. त्यांचा आम्ही कोल्हापुरात सत्कार करणार आहोत.- डॉ. रणजित सावंतगोवा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. प्रमोद सावंत यांचा त्यांच्या डॉक्टर मित्रांनी अंबाबाईची मूर्ती देऊन कोल्हापुरात सत्कार केला होता.

टॅग्स :goaगोवाministerमंत्री