शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशोत्सव रंगणार सहा दिवस, रविवारपासून प्रारंभ : तयारीला आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 12:06 IST

दिवाळी म्हणजे नावीन्य, प्रकाश, लक्ष-लक्ष तेजाचा उत्साह, आनंदाचा सण. मराठी पंचांगानुसार वर्षातील सर्वांत मोठा सण असलेल्या दिवाळीचा तेजोत्सव यंदा सहा दिवस रंगणार आहे. मुख्य सण सहा दिवस असला तरी तुळशी विवाहापर्यंत त्याचा जल्लोष सुरू राहणार आहे.

ठळक मुद्देप्रकाशोत्सव रंगणार सहा दिवसरविवारपासून प्रारंभ : तयारीला आला वेग

कोल्हापूर : दिवाळी म्हणजे नावीन्य, प्रकाश, लक्ष-लक्ष तेजाचा उत्साह, आनंदाचा सण. मराठी पंचांगानुसार वर्षातील सर्वांत मोठा सण असलेल्या दिवाळीचा तेजोत्सव यंदा सहा दिवस रंगणार आहे. मुख्य सण सहा दिवस असला तरी तुळशी विवाहापर्यंत त्याचा जल्लोष सुरू राहणार आहे.यंदा अधिक महिन्यामुळे दरवर्षी आॅक्टोबरमध्ये साजरी होणारी दिवाळी नोव्हेंबरमध्ये आली आहे. वर्षभर सणाच्या आगमनाची उत्सुकता आणि तयारीला आता वेग आला आहे. घरोघरी फराळाचा घमघमाट सुटला आहे. एकीकडे आकाशकंदिलांची, दुसरीकडे आबालवृद्धांसाठीच्या कपड्यांची खरेदी सुरू आहे. शहरातील मोठ्या मैदानांवर फटाक्यांचे स्टॉल्स लागले आहेत. रांगोळीच्या रंगांनी महाद्वार रोड, महापालिका चौक रंगला आहे. याशिवाय घराच्या सजावटीचे भरपूर साहित्य बाजारपेठेत आले आहे.दिवाळीचा मुख्य सोहळा नरकचतुर्दशीपासून सुरू होत असला तरी वसुबारसने त्याची सुरुवात होते. यंदा वसुबारस ते भाऊबीजेपर्यंतचा हा दिवाळीचा सोहळा सहा दिवस रंगणार आहे.

वसुबारस : यंदा वसुबारस रविवारी (दि. ४) असून या दिवशी शेतकऱ्यांचा सखा असलेल्या गाय, बैल, म्हैस या मुक्या प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी गाय-बैलांना न्हाऊ-माखू घालून छान तयार केले जाते. त्यांचे औक्षण करून गोडधोड खायला दिले जाते.धनत्रयोदशी, यमदीपदान (दि. ५) : धनत्रयोदशी दिवशी व्यापारी नवीन वही घालतात. या दिवशी सूर्योदयापासून सकाळी ८ आजून ७ मिनिटांनी अमृत, साडेनऊ ते १० वाजून ५७ मिनिटे या वेळेत शुभ व दुपारी सव्वातीन ते सायंकाळी सहा या वेळेत अमृत मुहूर्त आहे. या वेळेत व्यापारी वही आणता येईल. या दिवशी आरोग्यदेवता धन्वंतरी जयंती असल्याने डॉक्टर, मेडिकल, केमिस्ट अशा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्ती धन्वंतरीचे पूजन करतात. काही घरांमध्ये धण्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवून पूजन केले जाते. याच दिवशी यमदीपदान असून, सायंकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावण्याची पद्धत आहे. असे केल्याने कुटुंबात अकाली मृत्यूचे संकट येत नाही, अशी श्रद्धा आहे.नरकचतुर्दशी (दि. ६) : दिवाळीची खºया अर्थाने सुरुवात होते, ती या दिवसापासून. या दिवशी पहाटे उटणे, सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान केले जाते. कुटुंबातील मुले, पुरुषांना अंघोळ घालून औैक्षण केले जाते व कुटुंबीय एकत्रित फराळाचा आनंद घेतात.लक्ष्मी-कुबेर पूजन (दि. ७) : दीपोत्सवातील हा चौथा दिवस असून या दिवशी अमावास्येचा योग साधून सायंकाळी लक्ष्मी-कुबेर पूजन केले जाते. या दिवशी सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ या वेळेत प्रदोषकाळ असून या कालावधीत लक्ष्मीपूजन करता येईल. या दिवशीच वहीपूजनही केले जाते.बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा (दि. ८) : या दिवशी सुवासिनी पतीचे औक्षण करतात. हा दिवस वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून या मुहूर्तावर केलेली खरेदी अथवा कार्य शुभ मानले जाते. घरात सुख-समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे वर्षभर बचतीतून जमा केलेला पैसा या दिवशीच्या खरेदीसाठी वापरला जातो.भाऊबीज (दि. ९) : भावा-बहिणीच्या नात्याप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करणाºया या दिवशी बहीण भावाचे औक्षण करते. पंचपक्वानांचे जेवण होते.सहा दिवसांच्या उत्सवानंतर २० तारखेला तुलसीविवाह आहे. या दिवशी तुळशीचे लग्न लावले जाते; तर २२ तारखेला त्रिपुरारी पौर्णिमा असून, या दिवशी दिवे लावल्यानंतर दीपावली उत्सवाची सांगता होते. 

 

टॅग्स :Diwaliदिवाळीkolhapurकोल्हापूर