शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

तावडेंनी वादात तेल ओतले, प्रकाश आंबेडरांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 05:07 IST

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाचा जसा बट्ट्याबोळ केला, तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचे होणार आहे. ‘टिस’च्या समितीची मानसिकता पाहता, हे सरकार गेल्यानंतरच अहवाल येण्याची शक्यता असल्याची टीका भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

कोल्हापूर - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाचा जसा बट्ट्याबोळ केला, तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचे होणार आहे. ‘टिस’च्या समितीची मानसिकता पाहता, हे सरकार गेल्यानंतरच अहवाल येण्याची शक्यता असल्याची टीका भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.सोलापूर विद्यापीठ नामांतरप्रश्नी धनगर व लिंगायत समाजांत सरकारने वाद निर्माण केला असून, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्यात तेल ओतण्याचे काम केल्याची टीकाही त्यांनी केली.अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले, कॉँग्रेसने धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवला. त्यामुळे या समाजाने भाजपला पाठबळ दिले; पण त्यांनीही फसवणूक केली आहे.आता ‘टिस‘ (टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स) या संस्थेतर्फे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली. यासाठी समितीचे काम सुरू असतानाच मंत्री विनोद तावडे यांनी आहिल्यादेवींचे नाव दिले तर दंगल उसळेल, असे वक्तव्य केले.त्यानंतर, समिती सदस्यांनी बसवेश्वरांचे नाव पुढे केले. धनगर व लिंगायत समाजांत वाद निर्माण करायचा आणि आपली सत्ता अबाधित ठेवण्याचे राजकारण भाजप करीत आहे. अहिल्यादेवींचे कार्य साऱ्या महाराष्टÑाला माहिती आहे. त्यांच्या नावावर वादंग उठणेच अशक्य आहे.या वादावर पडदा टाकायचा झाल्यास तावडेंनी माफी मागायला हवी, असे अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले.पंढरपुरात २० मे रोजी ‘सत्ता संपादन निर्धार मेळावा’आलुतेदार-बलुतेदारांना एकत्र करून सत्ता हस्तगत करायची आणि सत्तेच्या माध्यमातूनच आपले प्रश्न मार्गी लावायचे आहेत, त्यासाठी २० मे रोजी पंढरपुरात सत्ता संपादन निर्धार मेळाव्याचे आयोजन केल्याची माहितीही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaharashtraमहाराष्ट्र