शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

थुंकीमुक्त कोल्हापूरसाठी फलकाद्वारे प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 16:12 IST

कोल्हापूर : भावा आता तरी शहाणा हो! कोरोनाचा विळखा वाढत आहे, बेजबाबदारपणे रस्त्यावर थुंकू नको, अशा आशयाचे फलक कोल्हापूर ...

ठळक मुद्दे ॲन्टीस्पिटींग मूव्हमेंटचा उपक्रम लवकरच मोक्याच्या ठिकाणी लागणार फलक

कोल्हापूर : भावा आता तरी शहाणा हो! कोरोनाचा विळखा वाढत आहे, बेजबाबदारपणे रस्त्यावर थुंकू नको, अशा आशयाचे फलक कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी लाउन त्यामार्फत प्रबोधन करण्यावर कोल्हापूरातील ॲन्टीस्पिटिंग चळवळीने भर दिला आहे. बुधवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात थुंकीमुक्त कोल्हापूरचे प्रबोधन करणारे फलक लावण्यात आले. चळवळीमार्फत लवकरच शहरातील मोक्याच्या ठिकाणी प्रबोधनात्मक फलक लावण्यात येणार आहेत.कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना नागरिक अजूनही बेजबाबदारपणे थुंकताना आढळत आहेत. यासाठी स्वयंशिस्त पाळणे ही प्राथमिक जबाबदारी बनली आहे. रस्त्यावर थुंकणे हा गुन्हा आहे, हे अजूनही न ठसल्यामुळे अजूनही बहुतांश नागरिक बेजबाबदारपणे थुंकताना आढळत आहेत.

यातून केवळ कोरोना विषाणूचाच नव्हे तर अनेक रोगांचाही वेगाने प्रसार होतो .थुंकणाऱ्या नागरिकांमुळे मौखिक व इतर गंभीर आजारांचा धोकाही आहे, त्यामुळे आपल्या आरोग्याबरोबर समाजाचेही आरोग्य चांगले रहावे, यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न केले पाहिजे, यासाठी कोल्हापूरातील ॲन्टीस्पिटिंग मूव्हमेंटने कंबर कसली आहे.कोल्हापुरातून सुरू झालेली थुंकीमुक्त चळवळ आता फलकांच्या माध्यमातून प्रबोधन करू पाहत आहे. याची सुरुवात बुधवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून झाली. यावेळी वाहतूक शाखेचे हवालदार संदीप निळपणकर यांच्यासह चळवळीच्या दीपा शिपूरकर, गीता हसुरकर, राहुल राजशेखर, विजय धर्माधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. या फलकाची संकल्पना संजय शिंदे, चंद्रकांत हल्याळ, फिरोज शेख, तुषार दिवेकर यांची आहे.मोक्याच्या ठिकाणी लागणार प्रबोधनात्मक फलकअमित सांगावकर यांनी त्यांच्या व्यावसायिक फलकाची जागा उपलब्ध करुन देऊन या सामाजिक चळवळीस पाठबळ दिले.भविष्यात रोटरीच्या सहाय्याने शहरातील मोक्याच्या ठिकाणी चळवळी मार्फत असे प्रबोधनात्मक फलक लावण्यात येणार आहेत. यापूर्वी चळवळीमार्फत स्टीकर्सच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार आहे.

रस्ते हे चालण्यासाठी आणि वाहतुकीसाठी असतात, रस्त्यावर थुंकणे हे मुळातच आपल्या संस्कृती, सभ्यतेचे अवमान करणारे ठरते. वंदे मातरम , म्हणजेच धरतीस वंदन, मग तिथे थुंकणे हा गंभीर गुन्हा ठरतो. प्रशासनानेही प्रबोधनाचे होर्डिंग्ज उभारावेत, थुंकणाऱ्यांविरोधात दंडनीय कारवाईसह गुन्हेच नोंदवावेत, धडक कारवाईनेच यास प्रतिबंध करता येऊ शकेल. प्रशासनाची ही मोठी जबाबदारी आहे, असे चळवळीच्या कार्यकर्त्यांना वाटते.- दीपा शिपूरकर,संस्थापक, ॲन्टीस्पिटिंग मूव्हमेंट, कोल्हापूर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यkolhapurकोल्हापूर