शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक एड्स दिनानिमित्त प्रभात फेरी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 14:06 IST

‘पाव्हणं जरा जपून, एड्स आला लपून’, एड््स जाणा, एड्स टाळा, ‘लग्नाची कुंडली पाहण्याआधी आरोग्याची कुंडली पाहा ’ अशा घोषणा देत जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्या माध्यमातून रविवारी सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली.

ठळक मुद्देजागतिक एड्स दिनानिमित्त प्रभात फेरी उत्साहातजिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक सहभागी

कोल्हापूर : ‘पाव्हणं जरा जपून, एड्स आला लपून’, एड््स जाणा, एड्स टाळा, ‘लग्नाची कुंडली पाहण्याआधी आरोग्याची कुंडली पाहा ’ अशा घोषणा देत जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्या माध्यमातून रविवारी सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली.या प्रभात फेरीची सुरुवात छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, अभिनेते आनंद काळे, आदींच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली.यानिमित्त बोलताना महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, एड्स जनजागृती मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. एच.आय.व्ही. संसर्गितांना धीर दिला पाहिजे, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, जनजागृती आणि प्रबोधन करणे काळाची गरज बनली आहे.

शहराच्या प्रमुख मार्गांवरून जनजागृतीपर घोषणा देत ही प्रभात फेरी फिरून पुन्हा छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात विसर्जित करण्यात आली. सुरूवातीला आंध्रातील डॉ. प्रियंका रेड्डी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या फेरीत डॉ. विलास देशमुख, डॉ. राजेश पवार, डॉ. हर्षला वेदक, डॉ. सुप्रिया देशमुख यांच्यासह एन.एस.एस.,एमसीसी महाविद्यालयीन विद्यार्थिनी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्यातर्फे रविवारी सकाळी सीपीआर रुग्णालयातून प्रभात फेरी काढण्यात आली. यात महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अभिनेते आनंद काळे, आदी सहभागी झाले होते.

 

 

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर