शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
11
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
12
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
13
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
14
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
15
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
16
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
17
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
18
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
19
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
20
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

शक्तिप्रदर्शनाचा दिल्ली दौरा

By admin | Updated: December 10, 2014 00:02 IST

५३ नगरसेवकांचा सहभाग : महापालिका निवडणुकीची पायाभरणी

कोल्हापूर : महापालिकेतील सर्वपक्षीय ७७ नगरसेवकांपैकी तब्बल ५३ नगरसेवक राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांचे निमंत्रण स्वीकारून, दिल्ली वारीला रवाना झाले. महाडिक यांनी आयोजित केलेल्या सहलीला तोकडा प्रतिसाद मिळावा, यासाठी पडद्यामागे घडामोडी घडल्या. दिल्लीवारीच्या निमित्ताने महापालिकेच्या आगामी निवडणुकांची पायाभरणी असल्याची महापालिकेत चर्चा आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व दहा महिन्यांत अशा शक्तिप्रदर्शनाच्या अनेक खेळ्या खेळल्या जाण्याची शक्यता आहे.थेट पाईपलाईनमधून काहीच हाताला लागले नसल्याने नगरसेवकांतील नाराजीचा फायदा घेत विधानसभा निवडणुकीत प्रा. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी, कॉँग्रेससह शिवसेना, भाजप, जनसुराज्य व अपक्ष अशी मिळून २५ नगरसेवकांनी मोट बांधत, निवडणुकीत वेगळी चूल मांडली. हा प्रयोग यशस्वी झाला. राष्ट्रवादीच्या संमतीने व काँग्रेसमधील नाराजांना घेऊन सत्तांत्तर घडविण्याच्या हालचाली वेगावल्या. मात्र, नव्या सभागृहात सत्तेस्थापनेसाठीच करू, अशी रणनीती राष्ट्रवादीसह प्रा. जयंत पाटील यांनी आखली.विधानसभेच्या धक्कादायक निकालानंतर ‘बॅकफुट’वर गेलेली काँग्रेस अजून सावरली नाही. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून प्रा. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीसह शिवसेना, भाजप, जनसुराज्य व अपक्ष अशा नगरसेवकांनी विरोधाची मोटबांधणी सुरू केली. निवडणुकीत कॉँग्रेस विरुद्ध सर्व अशी निवडणुकीचे रणांगण करण्याची तयारी सुरू आहे. राष्ट्रवादी-जनसुराज्य यांच्या जोडीला ताराराणी आघाडी रणांगणात असणार आहे. सेना व भाजपची निवडीनंतर साथ घेणार, असेही कारभारीने स्पष्ट केले. यामुळे दिल्लीवारीला महत्त्व आले.लिटमस टेस्ट कोणतेही आढेओढे न घेता राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, जनसुराज्य पक्ष, अपक्ष व कॉँग्रेसचे असे मिळून तब्बल ५३ नगरसेवक दिल्ली सहलीला तयार झाले. दहा महिन्यांत होणाऱ्या निवडणुकीवर विधानसभा निवडणुकीचे सावट असणार आहे. त्यामुळे धास्तावलेल्या नगरसेवकांनी ही निवडणूक ‘चांगल्या बॅनर’खाली लढविण्याची तयारी केली आहे. त्यामुळे ही दिल्ली सहल येत्या निवडणुकीसाठी ताराराणी आघाडी किंवा राष्ट्रवादीला लिटमस टेस्ट ठरणार आहे. भविष्यात कोण-कोण सोबत येऊ शकते, याची चाचपणी झाली आहे.गेल्या अनेक वर्षांनंतर नगरसेवक दिल्ली सहलीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. राजकीय मतभेद बाजूला सारून फक्त‘सहल’ या उद्देशानेच दिल्लीला गेलो. यामध्ये कोणतेही शक्तिप्रदर्शन किंवा सत्तांतराचा हेतू नाही. - राजेश लाटकर (गटनेता- राष्ट्रवादी)पक्षसंख्याबळअपक्षांचा पाठिंबाकाँग्रेस३३०२राष्ट्रवादी२६०१शिवसेना-भाजप ०९०२ जनसुराज्य आघाडी०९०५एकू ण - ७७ स्वीकृत- ०५