शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडीत, शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर वीजपुरवठा तात्काळ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 18:08 IST

कृषी पंपाची बिले भरली नाहीत म्हणून पुर्ण डीपीचाच वीजपुरवठा खंडीत करण्याचा तुघलकी निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात आज, शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन करीत महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

कागल : येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडून कृषी पंपाची बिले भरली नाहीत म्हणून पुर्ण डीपीचाच वीजपुरवठा खंडीत करण्याचा तुघलकी निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात आज, शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन करीत महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. शेतकरीवर्ग आक्रमक झाल्याने डीपींचा वीजपुरवठा तात्काळ सुरू करीत असल्याचे कंपनीकडून जाहीर करण्यात आले.दरम्यान चुकीची तसेच वाढीव आलेली बिले दुरूस्त करून देण्यात येतील. मोठ्या रक्कमेच्या बिलांना हप्ते करून देण्यात येईल. मात्र दोन ते तीन दिवसानंतर जर बील भरले नाही तर वैयक्तीक कनेक्शन बंद करण्यात येतील. असेही उप कार्यकारी अभियंता विक्रांत सपाटे यांनी स्पष्ट केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर कोंडेकर, अविनाश मगदुम, प्रभु भोजे, सचिन घोरपडे, अशोक शिरोळे, बाळासाहेब पाटील यांच्यासह काही शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या मनमानीपणाबद्दल तक्रारी मांडल्या. या आंदोलनात कागल, करनुर, वंदुर या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या‌वेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भाषणे केली. विज वितरण कंपनीचे विक्रांत सपाटे, तानाजी  कोरवी, विणा मठकर यांना धारेवर धरले. अजय पोवार हे कार्यकर्त्यांचा रोष पाहून तेथून पसार झाले. पोलीस उपनिरिक्षक शशिकांत गच्चे यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी मध्यस्थी करीत आंदोलनात तोडगा काढला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी