शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

सत्ता अबाधित.. आव्हान कायम..!

By admin | Updated: July 18, 2014 00:57 IST

कारण - राजकारण : गडहिंग्लज पालिका; आश्वासनांची वचनपूर्ती होणार का?

राम मगदूम- गडहिंग्लजनगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडीतसत्ता अबाधित राहिली तरी ‘गडहिंग्लज’मधील कळीचे प्रश्न सोडविण्याबरोबरच नगरपालिकेच्या निवडणुकीत शहरवासीयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर कायम आहे.अडीच वर्षांपूर्वी झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी जनतादल-जनसुराज्य-काँगे्रस आघाडीला हटवून राष्ट्रवादी सत्तेवर आली. राष्ट्रवादीला नऊ, तर विरोधी आघाडीला आठ जागा मिळाल्या. विरोधी आघाडीतील एक नगरसेवक ‘जनसुराज्य’चा आहे.नगरपालिका शिक्षण मंडळ निवडणुकीत ‘जनसुराज्य’चे नगरसेवक नरेंद्र भद्रापूर यांनी ‘राष्ट्रवादी’ला पाठबळ दिले. त्याबदल्यात त्यांना बांधकाम सभापतिपद मिळाले. मात्र, ‘कार्यपद्धती’वरून सत्ताधाऱ्यांशी बिनसल्यामुळे त्यांनी सभागृहात पुन्हा विरोधकांच्या सुरात सूर मिसळायला सुरुवात केली.नगरपालिकेच्या अलीकडील सर्वसाधारण सभेत दिनकरराव शिंदे मास्तर शाळा इमारतीच्या मुद्द्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. त्यानंतर सत्तांतरासाठी ते विरोधकांसोबत राहिल्यामुळे बहुमत असूनही नेत्यांना ‘मना’सारखा निर्णय घेणे कठीण झाले होते.नगराध्यक्षपदाच्या दावेदार लक्ष्मी घुगरे, अरुणा शिंदे व सरिता गुरव यांच्यात एकमत घडविण्यात माघारीच्या दिवसापर्यंत यश न आल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला. इच्छुक तिघींनाही समान कालावधीची संधी देण्याचे आश्वासन देऊन मंत्री मुश्रीफ यांनी समझोता घडवून आणला. त्यामुळेच घुगरे व चौगुले यांच्या निवडीची आणि लिंगायत समाजाला संधी देण्याची संधी राष्ट्रवादीला मिळाली.१०० कोटींचा निधी आणून जिल्ह्याची दक्षिण राजधानी म्हणून गडहिंग्लजचा चेहरा-मोहरा बदलण्याचे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिल्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पॅनेलकडे ‘गडहिंग्लज’करांनी पालिकेची सत्ता दिली. मात्र, मुत्सद्दी राजकारणात माहीर असूनही ‘गडहिंग्लज’ची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी त्यांनाही ‘दिव्या’तून जावे लागले. त्यामुळे नगरवासीयांना दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती करण्याचे आव्हान त्यांच्यासह पदाधिकाऱ्यांसमोर आहे.