शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

कोल्हापूर ‘वंदे भारत’चे संभाव्य वेळापत्रक तयार, सात तासात मुंबईला पोहोचणार; धनंजय महाडिकांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 13:27 IST

वंदे भारत एक्स्प्रेस कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी वरदान ठरणार

कोल्हापूर : बहुप्रतीक्षेतील कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे संभाव्य वेळापत्रक तयार करण्यात आले असून, या प्रवासासाठी फक्त सात तास लागणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.देशभर वंदे भारत एक्स्प्रेसचा बोलबाला सुरू असून, कोल्हापूरला ही सेवा लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केली होती. ज्या ठिकाणाहून या रेल्वेचे डबे तयार होत आहेत तेथील कामाची गती वाढवण्यात आल्याने कोल्हापूरसाठी लवकरच ही सेवा सुरू होण्याची शक्यता वाढीस लागली आहे.यातील पुढचा टप्पा म्हणजे या रेल्वे सेवेचे संभाव्य वेळापत्रकच तयार करण्यात आले आहे. त्यानुसार कोल्हापूर मुंबई प्रवासाला सात तास लागणार आहेत. आलिशान आणि वेगवान असणाऱ्या या रेल्वेची कोल्हापूरसाठी मोठी मागणी होत आहे. सह्याद्री एक्स्प्रेस बंद झाल्यानंतर सर्व ताण महालक्ष्मी एक्स्प्रेसवर आला असून, एका दिवसात निवांतपणे मुंबईला जाऊन येण्यासाठी ही वंदे भारत एक्स्प्रेस कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे.

कोल्हापूर मुंबई

  • कोल्हापूरहून निघणार पहाटे ५.५०
  • मिरज ६.१८
  • सांगली ६.३५
  • सातारा ७.५५
  • पुणे १०.०३
  • कल्याण १२.०५
  • ठाणे १२.२५
  • छ. शिवाजी महाराज टर्मिनस दुपारी १२.५६

मुंबई कोल्हापूर

  • छ. शिवाजी महाराज टर्मिनस संध्याकाळी ५.०३
  • ठाणे ५.२५
  • कल्याण ५.३९
  • पुणे ७.५५
  • सातारा ९.२५
  • सांगली ११.३३
  • मिरज ११.४५
  • कोल्हापूर ११.५५

रेल्वेचे अधिकारी अशा पद्धतीने वेळापत्रक तयार करत आहेत. या रेल्वेचा ताशी १६० कि.मी. असल्याने हातकणंगले ते मिरज या दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे मजबुतीकरण आवश्यक आहे. परंतु, येत्या दोन महिन्यात ही सेवा सुरू करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. - धनंजय महाडिक, खासदार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस