शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात यंदा जास्त वेळा पुराची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 17:18 IST

२०१९ पासूनचा अनुभव पाहता जिल्ह्यात पावसाळ्यात पुराचा सामना करावा लागतो. त्यामुळे पुराची शक्यता असणारे जिल्हे वगळून निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.

कोल्हापूर : यावर्षी अजूनही पाऊस अपेक्षेप्रमाणे सुरू न झाल्याने मात्र सरासरी पावसाची अपेक्षा असल्याने अतिकेंद्रित पावसाची खूप जास्त शक्यता आहे आणि कदाचित एकापेक्षा जास्तवेळा पूरपरिस्थितीला तोंड द्यावे लागू शकेल, असा अहवाल जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राज्य निवडणूक आयोगाला सोमवारी पाठवला. या अहवालानंतर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा चेंडू पुन्हा निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला असून, ते निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यासाठीची कार्यवाही सध्या राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने सुरू आहे. मात्र पावसाळ्यात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात अडथळे येतात. विशेषत: ज्या भागात अतिवृष्टी व पूर येतो तिथे या काळात निवडणूक घेणे अडचणीचे किंबहुना अशक्य असते. त्यामुळे निवडणूक आयोगाने ४ मे २०२२ रोजी राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाला आपल्या जिल्ह्यात मागील पाच वर्षांत घडलेल्या गंभीर स्वरुपाच्या नैसर्गिक आपत्तीचा अहवाल मागितला आहे.त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने २०१७ ते २०२१ या काळातील नैसर्गिक आपत्तीचा तपशील विहीत नमुन्यात तयार केला असून, सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीनंतर तो राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला आहे. यामध्ये यावर्षी अजूनही पावसाला सुरुवात झालेली नाही; पण सरासरी पावसाची किमान अपेक्षा असल्याने केंद्रित पावसाची शक्यता खूप जास्त आहे आणि कदाचित एकापेक्षा जास्तवेळा पूरपरिस्थितीला तोंड द्यावे लागू शकेल, असा अभिप्राय कळवला आहे. या अहवालानंतर आता जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत काय निर्णय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

१२ तालुक्यांची सविस्तर माहिती

या अहवालात जिल्हयातील १२ तालुक्यांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यात आपत्तीची तारीख, स्वरूप, कालावधी, प्रभावित झालेले क्षेत्र, प्रमाण याचा समावेश आहे. जिल्ह्यातील दुर्गम भाग वगळता जवळपास सर्व तालुक्यांना अतिवृष्टी व महापुराचाच फटका बसला आहे. याशिवाय चक्रीवादळ आणि भुस्खलनाने झालेले नुकसान याचा तपशील दिला आहे.

जिल्हा वगळण्याची शक्यताकोल्हापुरात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यासाठीची प्रभाग रचना, हरकती व त्यावरील सुनावण्या याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. नगरपालिका निवडणूक मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाला आहे; पण २०१९ पासूनचा अनुभव पाहता जिल्ह्यात पावसाळ्यात पुराचा सामना करावा लागतो. त्यामुळे पुराची शक्यता असणारे जिल्हे वगळून निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर