शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भांडवली मूूल्यावर आधारित घरफाळा रद्द होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 12:03 IST

मुंबई महानगरपालिकेने केलेली भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेतील अशाच प्रकारे होत असलेली कर आकारणी रद्द होण्याची आशा निर्माण झाली आहे. याबाबत रात्री महापालिका घरफाळा विभागाकडे चौकशी केली असता, निकालाची अधिकृत माहिती नसल्याने याबाबत भाष्य करण्याचे अधिकाऱ्यांनी टाळले.

ठळक मुद्देभांडवली मूूल्यावर आधारित घरफाळा रद्द होण्याची शक्यतामुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम

कोल्हापूर : मुंबई महानगरपालिकेने केलेली भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेतील अशाच प्रकारे होत असलेली कर आकारणी रद्द होण्याची आशा निर्माण झाली आहे. याबाबत रात्री महापालिका घरफाळा विभागाकडे चौकशी केली असता, निकालाची अधिकृत माहिती नसल्याने याबाबत भाष्य करण्याचे अधिकाऱ्यांनी टाळले.मुंबई महानगरपलिकेतर्फे २०१० सालापासून भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी केली जात होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ती अवैध ठरली आहे. तसेच मुंबई म्युनिसिपल कायद्यातील संबंधित कलमे रद्द होतील.कोल्हापूर महानगरपालिकाही सन २०१२-१३ या वर्षापासून शहरातील मिळकतींवर भांडवली मूल्यावर आधारित करआकारणी करीत आहे.

ही करपद्धती अन्यायकारक तसेच भरमसाटी असल्याच्या तक्रारी शहरातील विविध संघटना तसेच व्यक्तींनी यापूर्वी केल्या असून ती रद्द करण्याची मागणी होत आहे. परंतु महापालिका प्रशासनाने त्यास दाद लागू दिली नाही. तिची अंमलबजावणी सुरूच ठेवली आहे.

जेव्हा ही करवाढ लागू केली तेव्हा ती एकदम ४० टक्के झाली होती. तसेच भांडवली मूल्य २०१२-१३ सालचे धरण्यात आले होते. आजही तेच दर आहेत. त्यामुळे अन्य महानगरपालिकांच्या तुलनेत कोल्हापूर महानगरपालिकेचे दर सर्वाधिक असल्याने येथील व्यवसायवाढीवर परिणाम झाला आहे. अलीकडेच काही पदाधिकाऱ्यांनी भाड्याने दिलेल्या मिळकतींचा कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या आधारे कोल्हापुरातूनही न्यायालयात याचिका दाखल होण्याची शक्यता असून येथील कर आकारणी पद्धत रद्द होण्याची आशा निर्माण झाली आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल पाहिल्याशिवाय यावर काहीही भाष्य करता येणे शक्य नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर