शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

पॉझिटिव्ह डॉक्टरांचे अहवाल आले निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 16:19 IST

मुरगूड शहरातील तीन प्रसिद्ध डॉक्टर आणि एक लॅब टेक्निशियन यांचे कोरोना अहवाल रविवारी सकाळी पॉझिटिव्ह आले होते, तोपर्यंत सोमवारी सकाळी त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बातमी वाऱ्यासारखी मुरगूड शहरासह परिसरातील गावात पोहचली आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली. 

ठळक मुद्देपॉझिटिव्ह डॉक्टरांचे अहवाल आले निगेटिव्हमुरगूड परिसरात गोंधळ, उलटसुलट चर्चेला उत

मुरगूड : शहरातील तीन प्रसिद्ध डॉक्टर आणि एक लॅब टेक्निशियन यांचे कोरोना अहवाल रविवारी सकाळी पॉझिटिव्ह आले होते, तोपर्यंत सोमवारी सकाळी त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बातमी वाऱ्यासारखी मुरगूड शहरासह परिसरातील गावात पोहचली आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मागील आठवड्यात शहरात काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.त्यांच्या नातेवाईकांनी शहरातील काही खाजगी रुग्णालयात उपचार करून घेतले होते.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या रुग्णालयातल डॉकटरांना स्त्राव तपासणीसाठी नगरपालिका प्रशासनाने विंनती केली. त्यानुसार शहरातील तीन प्रसिद्ध डॉक्टर आणि एक लॅब टेक्निशियन यांनी २९ जुलैला कागल येथील कोविड सेंटर मध्ये आपले स्त्राव दिले. त्यानंतर ते येथील मंडलिक महाविद्यलयातील अलगिकरण कक्षात होते.दरम्यान, तांत्रिक कारणास्तव यांचे अहवाल येण्यास वेळ लागत होता. दोन ऑगस्टला या चौघांचे अहवाल प्राप्त झाले. त्यानुसार ते सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. ही बातमी ज्यावेळी शहरात समजली त्यावेळी अनेकांना धक्का बसला. कारण शहरातील आणि परिसरातील शेकडो रुग्ण या डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेले होते.

प्रशासनाने युद्धपातळीवर अशा उपचार घेतलेल्या रुग्णांची यादी बनवण्याचे काम सुरू केले होते.शहरातील तीन प्रसिद्ध डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने मोठ्या प्रमाणात समहू संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली होती.दरम्यान, आपले अहवाल येण्यास वेळ लागत असल्याने या चौघांनी एक ऑगस्टला पुण्यातील एका खाजगी लॅबमध्ये आपले स्त्राव दिले होते. त्यांनी जलद तपासणी करून आज सकाळी अहवाल पाठवले. यामध्ये या चौघांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले. ही बातमी त्यांच्या अहवालाच्या फोटोसह सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि शहरातील नागरिकांसह परिसरात संभ्रम निर्माण झाला.आपले अहवाल निगेटिव्ह आले असले तरी कोणताही धोका नको म्हणून या चौघांनी कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. सद्या यांना कोणताही त्रास नाही. पण तरीही आठ ते दहा दिवस लोकांच्या पासून दूर राहण्याचा निर्णय त्यांनी कळवला आहे.

आपण कायमच प्रशासनाला सहकार्य करू आणि नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्या डॉक्टरांनी केले आहे. पण एक दोन दिवसात पॉझिटिव्ह-निगेटिव्हचा हा खेळ मात्र सर्वसामान्यांना गोंधळात टाकणारा आहे हे मात्र नक्की.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टरkolhapurकोल्हापूर