शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

गर्भकल्याणकमध्ये दिवसभर पूजा बाहुबली महामस्तकाभिषेक : पंचकल्याणकचा दुसरा दिवस; श्रवणबेळगोळमध्ये गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:37 IST

कोल्हापूर/ बाहुबली : श्रवणबेळगोळ येथे सुरू असलेल्या गोमटेश्वर भगवान बाहुबली मूर्तीच्या ८८ व्या महामस्तकाभिषेक महोत्सवाच्या दुसºया दिवशी गुरुवारी गर्भकल्याणकसह विविध धार्मिक विधी पार पडले.

कोल्हापूर/ बाहुबली : श्रवणबेळगोळ येथे सुरू असलेल्या गोमटेश्वर भगवान बाहुबली मूर्तीच्या ८८ व्या महामस्तकाभिषेक महोत्सवाच्या दुसºया दिवशी गुरुवारी गर्भकल्याणकसह विविध धार्मिक विधी पार पडले. त्यासाठी सवालधारकांनी दिवसभर पूजा केली. भट्टारक पट्टाचार्य चारूकीर्ती स्वामीजी, आचार्य श्री १०८ वर्धमानसागर महाराज, त्यागीगण, महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील यांच्यासह सर्व राष्टÑीय पदाधिकारी, आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम होत आहेत.

पंचकल्याणकचा कार्यक्रम संस्कार मंडप येथे सुरू आहे. याठिकाणी पूजेचा मुख्य मान मिळालेले (इंद्र-इंद्रायणी) भागचंद चुरीवाल व पत्नी सुनीता चुरीवाल (गुवाहाटी, आसाम) यांच्यासह गर्भकल्याणक विधीच्या सवालधारकांनी गुरुवारी पूजा केली. सकाळी नादीमंगल, जलकुंभ, नित्य पंचामृत अभिषेक, आदी कार्यक्रम झाले. तीर्थंकर मातेचे गोदभरण करण्यात आले. त्यानंतर वाद्यांच्या निनादाद भव्य मिरवणुकीने भद्र कुंभ संस्कार मंडप येथे आणण्यात आला. नंतर गर्भशुद्धीचा विधी झाला. त्यावेळी अष्टदिकन्या तीर्थंकरमातेची सेवा करत असल्याचा देखावा उभारण्यात आला होता. रात्री गर्भावतरण विधी झाला.

दरम्यान, महामस्तकाभिषेकासाठी श्रवणबेळगोळमध्ये देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. त्यांना निवास, भोजन यासह विविध सेवा मिळाव्यात यासाठी वीर सेवा दल, सन्मती संस्कार मंच, वीर महिला मंडळ, जैन संघटनांचे स्वयंसेवक काम करत आहेत. त्याचे सर्व नियोजन दक्षिण भारत जैन सभेचे सागर चौगुले, अरविंद मजलेकर, बाबा हुपरे, सेवा दलाचे पदाधिकारी करत आहेत.तीर्थंकरमातेला सोळा स्वप्नांचा उलगडारात्री गर्भावतरण कार्यक्रमात तीर्थंकराच्या मातेला ऐरावत हत्ती, पांढरा बैल, सिंह, फुलांची माळ, लक्ष्मी, चंद्र, सूर्य, दोन कलश, माशांची जोडी, जलाशय, समुद्र, हिरेजडित सिंहासन, स्वर्गातील विमान, राजा नागेंद्रचे विमान, रत्नांच्या राशी, अग्नी ही सोळा स्वप्ने पडली. ही स्वप्ने फक्त तीर्थंकरमातेलाच पडतात, असे मानले जात असल्याने जैन धर्मामध्ये या स्वप्नांना अतिशय महत्त्व आहे. या स्वप्नातून तीर्थंकरमातेला आपला पुत्र भगवंत बनणार असून, तो भविष्यात मोक्षप्राप्ती करेल याचा उलगडा झाला. हे सर्व दाखविण्यासाठी पूजामंडपात प्रत्येक स्वप्नाची प्रतिकृती वाजत गाजत आणण्यात आली आणि या स्वप्नांचा अर्थ काय आहे, त्याचे महत्त्व विविध श्लोकांतून, मंत्रातून सांगण्यात आले.श्रवणबेळगोळ येथे गोमटेश्वर भगवान बाहुबली मूर्तीच्या महामस्तकाभिषेक महोत्सवात गुरुवारी सकाळी इंद्र-इंद्रायणींनी मिरवणुकीने जलकुंभ आणला.