शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रदूषण नियंत्रण’च्या अधिकाऱ्याला रस्त्यावरून फिरविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 11:55 IST

शहरातील रस्त्यावरील डांबर उखडून गेल्याने ते खराब झाले असून, सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे; त्यामुळे हवा प्रदूषण होत असून, त्यासाठी जबाबदार असणाऱ्या शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमवारी कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघातर्फे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली; यासाठी टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी गायकवाड यांना आंदोलकांनी शहरातील रस्त्यावरून फिरवून वस्तुस्थिती दाखविली. ती त्यांनी मान्यही केली.

ठळक मुद्दे वाहनधारक महासंघातर्फे धुळीच्या प्रदूषणासंदर्भात आंदोलन नेत्रदीप सरनोबत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोल्हापूर : शहरातील रस्त्यावरील डांबर उखडून गेल्याने ते खराब झाले असून, सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे; त्यामुळे हवा प्रदूषण होत असून, त्यासाठी जबाबदार असणाऱ्या शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमवारी कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघातर्फे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली; यासाठी टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी गायकवाड यांना आंदोलकांनी शहरातील रस्त्यावरून फिरवून वस्तुस्थिती दाखविली. ती त्यांनी मान्यही केली.दुपारी बाराच्या सुमारास महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देवणे, कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी उपप्रादेशिक अधिकारी गायकवाड यांना तोंडाला मास्क बांधूनच निवेदन सादर केले.यावेळी शहरातील रस्ते खराब झाले असून, रस्त्यावरील डांबर उखडून गेले आहे. त्यातील मुरुम व माती रस्त्यावर आली असून, त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होऊन श्वसनाचे विकार होत आहेत.

याची दखल घेऊन उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी २ नोव्हेंबरला महापालिकेचे शहर अभियंता सरनोबत यांना नोटीस बजावली आहे; परंतु त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने सरनोबत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देवणे व भोसले यांनी केली.यावर हे आपल्या अखत्यारित येत नसल्याचे गायकवाड यांनी सांगताच, आंदोलकांनी त्यांना वस्तुस्थिती दाखविण्यासाठी छत्रपती शिवाजी चौकात आणले. त्यांना सोबत घेऊनच आंदोलकांनी पापाची तिकटीपर्यंत खराब रस्त्याची स्थिती दाखविली. तसेच यामुळे उडणाऱ्या धुळीने व्यापाऱ्यांच्या विक्रीयोग्य वस्तू खराब झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

व्यापाऱ्यांनीही तीव्र प्रतिक्रिया गायकवाड यांच्यासमोर मांडल्या. शेवटी गायकवाड यांनी वस्तुस्थिती मान्य केली; परंतु जोपर्यंत सरनोबत यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत आंदोलन थांबविणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. आंदोलनात राजू जाधव, विजय गायकवाड, अशोक जाधव, दिलीप सूर्यवंशी, पोपट रेडेकर, तानाजी पाटील, उदय गायकवाड, नीलेश हंकारे, आनंदा चिले, इजाज फरास, नागेश बुचडे, चंदू पाटील, आदींचा सहभाग होता. 

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर