शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेच्या दोन प्रभागांसाठी २३ जून रोजी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 14:24 IST

महानगरपालिका प्रभाग क्रमांक २८-सिद्धार्थनगर व प्रभाग क्रमांक ५५-पद्माराजे उद्यान येथील रिक्तपदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केला. या दोन्ही प्रभागांत २३ जून रोजी मतदान होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्यास ३० मे पासून सुरुवात होत आहे. दरम्यान, या दोन प्रभागांकरिता शुक्रवारी सायंकाळपासूनच आचारसंहिता लागू

ठळक मुद्देआचारसंहिता लागू : गुरूवारपासून अर्ज भरण्यास प्रारंभ

कोल्हापूर : महानगरपालिका प्रभाग क्रमांक २८-सिद्धार्थनगर व प्रभाग क्रमांक ५५-पद्माराजे उद्यान येथील रिक्तपदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केला. या दोन्ही प्रभागांत २३ जून रोजी मतदान होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्यास ३० मे पासून सुरुवात होत आहे. दरम्यान, या दोन प्रभागांकरिता शुक्रवारी सायंकाळपासूनच आचारसंहिता लागू झाली.राष्टÑवादी कॉँग्रेसचे नगरसेवक अफजल पीरजादे व अजिंक्य चव्हाण यांनी स्थायी समिती सभापती निवडणुकीत पक्षाचा आदेश डावलून भाजपच्या उमेदवारास मतदान केल्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई म्हणून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले होते; त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक जाहीर केली.

महानगरपालिका आयुक्तडॉ. मल्लिनाथ कलशेट्टी ३० मे रोजी निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना जाहीर करतील. याच दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची ही प्रक्रिया सहा जूनअखेर चालणार आहे. २३ जून रोजी दोन प्रभागांसाठी मतदान होईल, तर लगेचच दुसरे दिवशी म्हणजे २४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारपासून लागू झाली असून, ती निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. आचारसंहिता निवडणूक होणाऱ्या संबंधित प्रभागातच लागू राहील, मात्र या प्रभागातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही.

प्रभागातील हालचाली गतिमाननिवडणूक जाहीर झाल्यामुळे सिद्धार्थनगर आणि पद्माराजे उद्यान प्रभागातील राजकीय हालचाली आता गतिमान होतील. पद्माराजे उद्यान येथे माजी नगरसेवक अजित राऊत आणि माजी उपमहापौर विक्रम जरग यांचे चिरंजीव अक्षय जरग यांच्यात होण्याची शक्यता आहे. मागच्यावेळी जरग यांनी ताराराणी आघाडीकडून निवडणूक लढविली होती. आता आमदार सतेज पाटील सांगतील त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल, असे जरग यांनी सांगितले. सिद्धार्थनगरातून शिवसेनेच्या तेजस्विनी घोरपडे, कॉँग्रेसचे जय पटकारे, धनंजय सावंत, विलास केसरकर, सुशील भांदिगरे असे मान्यवर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. पक्ष म्हणून कॉँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना व भाजप यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगण्यात आले. दोन-चार दिवसांत राजकीय पक्षांची भूमिका ठरणार आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम -- निवडणुकीची अधिसूचना-३० मे- उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात - ३० मे पासून- उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी-३० मे ते ६ जून- उमेदवारी अर्जांची छाननी-७ जून- उमेदवारी मागे घेण्याची मुदत-१० जूनपर्यंत- निवडणूक चिन्हांचे वाटप- ११ जून- मतदान-२३ जून- मतमोजणी-२४ जून

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका