शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

राजकारणी, बिल्डर थकबाकीदारांच्या यादीत, १५ दिवसांनंतर महापालिका करणार मिळकती जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 18:18 IST

घर आणि कार्यालयाचे विजेचे बिल, मोबाईलचे बिल, कर्जाचे हप्ते, विम्याचे हप्ते अगदी न चुकता वेळेवर भरणारे तथाकथित राजकारणी, बिल्डर, विविध संस्था कोल्हापूर महानगरपालिकेचे हजारांतील पाण्याचे बिल भरण्यास मात्र कचरत असल्याची बाब शनिवारी समोर आली.

ठळक मुद्देराजकारणी, बिल्डर थकबाकीदारांच्या यादीत!१५ दिवसांनंतर महापालिका करणार मिळकती जप्तनिवेदिता माने, खानविलकर, दीपा मगदूम यांनी थकविले पाण्याचे बिल

कोल्हापूर : घर आणि कार्यालयाचे विजेचे बिल, मोबाईलचे बिल, कर्जाचे हप्ते, विम्याचे हप्ते अगदी न चुकता वेळेवर भरणारे तथाकथित राजकारणी, बिल्डर, विविध संस्था कोल्हापूर महानगरपालिकेचे हजारांतील पाण्याचे बिल भरण्यास मात्र कचरत असल्याची बाब शनिवारी समोर आली.

दुसऱ्यांना कायद्याची भीती घालणारे पोलीस खाते, सरकारी महसुलाच्या वसुलीकरिता प्रसंगी जप्तीच्या नोटिसा पाठविणारी सरकारी कार्यालये, एवढेच काय, तर आपली पाणीपट्टी भरली नाही म्हणून महापालिकेच्या मुख्य कार्यालयाचे वीज कनेक्शन तोडायला सरसावलेल्या पाटबंधारे विभागानेदेखील महापालिकेची पाणीपट्टी थकविण्यात बाजी मारली आहे.कोल्हापूर महानगरपालिका शहर पाणीपुरवठा विभागाने शनिवारी शहरातील ५० हजारांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या १०१२ थकबाकीदारांची नावेच वृत्तपत्रातून जाहीर केली आहेत. त्यातून अनेक तथाकथित बडेजाव मारणाऱ्या मंडळींचा बुरखा फाडण्यात आलेला आहे. त्यांना त्यांची थकबाकी भरण्यास १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्या मुदतीत त्यांनी जर थकबाकी भरली नाही तर त्यांच्या मिळकती जप्त करून त्याच्या विक्रीतून या बिलाची थकबाकी वसूल केली जाणार आहे.मोबाईल कनेक्शन बंद होईल, विजेचे कनेक्शन बंद करतील या भीतीपोटी शहरवासीय न चुकता, अगदी वेळेवर बिले भरतात. त्यात कसलीही हयगय केली जात नाही.

मात्र महानगरपालिकेचा घरफाळा, पाणीपट्टी भरायची म्हटली की त्यांचे हात आखडतात. महानगरपालिका आपलीच आहे, आपल्याच सेवेकरिता आहे, याचा त्यांना विसर पडतो. शनिवारी जी थकबाकीदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे, त्यात सर्वसामान्यांची संख्या अगदीच नगण्य असली तरी त्यांत राजकारणी, बिल्डर, मोठे व्यावसायिक, व्यापारी, हौसिंग सोसायटी, शासकीय कार्यालयांचा मोठ्या संख्येने समावेश आहे.थकबाकीदारांच्या यादीत निवेदिता संभाजीराव माने - ५८,७६५, दिग्विजय खानविलकर- ५९,१८८, दीपा दिलीपराव मगदूम - ७५,९४१, पंडितराव सडोलीकर - ५९,१६८ , सुभाषराव नियोगी - ६१,७८५, प्रकाश शेलार - १२३५११, राजन हारुण फरास - १४४७१२, राधेशामजी शर्मा - ५३,३५६, मनोहर शर्मा - ८५,०८८, नागोजीराव अजितसिंह पाटणकर - ५६,४९९, व्ही. एच. अपराध - १६३८७८, दिलीप अतिग्रे - ५७,७७०, भरत फाळके - ६८,६९० यांचा समावेश आहे.शालिनी पॅलेस- १८८६११, अयोध्या हौसिंग सोसायटी- १२५११२, जवाहरनगर हौसिंग सोसायटी- ६१,२२३, छत्रपती शाहू जलतरण तलाव (आर.एल. तावडे)- ३५ लाख ०१ हजार ७१२ आणि ८१ हजार ५०९, मयूर दूध संघ- ५३,८८८ यांसह अनेक संस्थांचा थकबाकीदारांच्या यादीत समावेश आहे.

महानगरपालिका हद्दीत यायला नको म्हणणाऱ्या काही ग्रामपंचायतींनी पाणी घेतले; पण त्याचे बिलच भरलेले नाही. अशा थकबाकीदारांच्या यादीत गांधीनगर, हणमंतवाडी, शिंगणापूर, वळिवडे, उचगाव, बालिंगा, नागदेववाडी, सरनोबतवाडी, चिंचवाड यांचा समावेश आहे.सीपीआर रुग्णालयाची थकबाकी सर्वाधिक म्हणजे ४ कोटी २७ लाख, ५९ हजार ३९७ आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळ - ११२०४५, लक्ष्मीपुरी पोलीस लाईन- १९ लाख ४२ हजार ९७३, जुना बुधवार पोलीस लाईन- १७ लाख ५७ हजार ८९२ व ११ लाख ३८ हजार ६१३, नवीन सर्किट हाऊस- ५० लाख ८८ हजार ३१७, उपअभियंता पंचगंगा पाटबंधारे विभाग- ११ लाख ६४ हजार ०७९, रेल्वेस्थानक - ७ लाख ८० हजार ५७० एवढी थकबाकी आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थानही थकबाकीदारज्यांनी कायद्याने व्यवहार चालावा यासाठी आग्रह धरायचा असतो, ते जिल्हा प्रशासनही थकबाकीत आहे. दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानाचे ३ लाख ७५ हजार ८३४ रुपयांचे पाण्याचे बिल थकले आहे. करवीर प्रांत कार्यालय - १ लाख १९ हजार ६९८ आणि ९४ हजार ७५१, करवीर तहसीलदार कार्यालयाचे ८२ हजार १६८ रुपयांचे बिल थकले आहे.

 

टॅग्स :WaterपाणीPoliticsराजकारणkolhapurकोल्हापूर