शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जवानांच्या त्यागाचा भाजपकडून राजकीय लाभ : शरद पवार यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 14:20 IST

पुलवामा येथील लष्करी वाहनांवर झालेला दहशतीवादी हल्ला आणि त्यामध्ये शहिद झालेल्या जवानांच्या त्यागाचा केंद्रातील मोदी सरकार राजकीय स्वार्थासाठी लाभ उठवित असून ही गोष्ट अतिशय दुर्दैवी असल्याची घणाघाती टिका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी मुंबई येथून कोल्हापुरातील कार्यकर्त्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना केली.

ठळक मुद्देजवानांच्या त्यागाचा भाजपकडून राजकीय लाभ : शरद पवार यांचा घणाघातजवान शहिद झाल्यानंतरही मोदी प्रचारसभेत व्यस्त

कोल्हापूर : पुलवामा येथील लष्करी वाहनांवर झालेला दहशतीवादी हल्ला आणि त्यामध्ये शहिद झालेल्या जवानांच्या त्यागाचा केंद्रातील मोदी सरकार राजकीय स्वार्थासाठी लाभ उठवित असून ही गोष्ट अतिशय दुर्दैवी असल्याची घणाघाती टिका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी मुंबई येथून कोल्हापुरातील कार्यकर्त्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना केली.आजवर केंद्र सरकारने राफेल व्यवहारासंदर्भातील माहिती लपवून ठेवली आणि आता तर राफेल व्यवहाराची कागदपत्रेच चोरीला गेल्याची माहिती सांगितली जाते ही घटना अत्यंत गंभीर तसेच या संपूर्ण व्यवहारावरच संशय निर्माण करणारी असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे बुथ अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी पवार यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, आर. के. पोवार उपस्थित होते.जवानांच्या वाहनांवर जेंव्हा हल्ला झाला, तेंव्हा देशभरातील सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी लष्काराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा तसेच राजकारण आणायचे नाही असा निर्धार केला. मात्र सत्तेतील लोकच त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न करु लागले आहेत. हल्लयाच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीत सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलविली. पण प्रधानमंत्री, गृहमंत्री, संरक्षण, मंत्री भाजपचे पक्ष प्रमुख अशी मंडळी उपस्थित नव्हती.

प्रधानमंत्री तर हल्लयानंतरही कामांची उद्घाटने करत, पक्षाचा प्रचार करत फिरत होते. तरीही आम्ही त्यावर टिका केली नाही. निवडणुका येतील आणि जातील. अशा कठीण प्रसंगात लष्काराच्या पाठीशी ठाम राहिले पाहिजे, दुर्दैवाने जवानांच्या त्यागाचा राजकीय लाभ उठविण्यात सरकार प्रयत्न करत आहे, असे पवार म्हणाले.सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचा कारभार केला नाही तर आपल्या लोकांच्या फायद्यासाठी सत्तेचा गैरफायदा घेतला. अशा प्रवृत्तीना दूर करण्याची भूमिका आपण सर्वानी घेतली पाहिजे. सरकारच्या कामाचा पंचनामा करुन तो जनतेसमोर मांडावा असे आवाहन पवार यांनी यावेळी केले. प्रारंभी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वागत केले. तर खासदार महाडिक यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारkolhapurकोल्हापूर