शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३ लाख २३ हजार बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 14:29 IST

Polio dose Kolhapur- याआधी स्थगित करण्यात आलेली पल्स पोलिओ मोहीम उद्या, रविवारी ३१ जानेवारी रोजी होणार आहे. जिल्ह्यातील ५ वर्षांखालील ३ लाख २३ हजार ५४६ बालकांना डोस देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ३ लाख २३ हजार बालकांना पोलिओ डोस११८ आरोग्य संस्थांचे ६४४७ अधिकारी, कर्मचारी मोहिमेत

कोल्हापूर : याआधी स्थगित करण्यात आलेली पल्स पोलिओ मोहीम उद्या, रविवारी ३१ जानेवारी रोजी होणार आहे. जिल्ह्यातील ५ वर्षांखालील ३ लाख २३ हजार ५४६ बालकांना डोस देण्यात येणार आहे.सकाळी ८ ते सायंकाळी ५ या कालावधीत कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील २४१६ बुथवर डोस दिले जाणार आहेत. यासाठी ६४४७ आरोग्यसेवक, पर्यवेक्षक आणि वरिष्ठ आरोग्य अधिकारी नियोजनामध्ये आहेत. ७०६ मोबाईल पथके असून ऊस कामगारांच्या वस्तीपासून ते रस्त्याची कामे करणाऱ्यांच्या पालापर्यंत ही पथके जाऊन डोस देणार आहेत. २९७ ट्राझिंट पथके असून रेल्वे स्टेशन, बसस्थानकांवर ती तैनात करण्यात येतील.डोस दिल्यानंतर दुसऱ्याच दिवसांपासून ३०९६ पथकांच्या माध्यमातून घरोघरी भेटी देऊन फेरसर्वेक्षण करण्यात येणार असून कोणाला डोस मिळाला नसेल तर त्याची खात्री करून तो देण्यात येणार आहे. यासाठी अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. 

  • कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील लाभार्थी बालके ४८,६३८
  • नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील लाभार्थी ५३,८४६
  • ग्रामीण भागातील लाभार्थी २,२१,०६२
  • एकूण ३, २३,५४६

पल्स पोलिओ मोहिमेची तयारी झाली असून डोसही शीतकरण साखळीतून पोहोच करण्यात येत आहेत. पालकांनी रविवारी न चुकता आपल्या बालकांना डोस देऊन त्यांच्या आरोग्याबाबत पूर्वदक्षता घ्यावी.डॉ. योगेश साळे,जिल्हा आरोग्य अधिकारी, कोल्हापूर जिल्हा परिषद

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर