शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस उपनिरीक्षकाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू, कोल्हापूर पोलिस अधीक्षक कार्यालयात घडली घटना

By उद्धव गोडसे | Updated: December 16, 2023 19:19 IST

चार दिवसात दुसऱ्या अधिकाऱ्यास त्रास

कोल्हापूर : पोलिस अधीक्षक कार्यालयात वाचक शाखेत कार्यरत असलेले प्रतापराव जगन्नाथ भुजबळ (वय ५४, मूळ रा. अंगापूर, जि. सातारा, सध्या रा. पोलिस क्लब, मुख्यालय, कोल्हापूर) यांना शनिवारी (दि. १६) दुपारी साडेबाराच्या सुमारास कर्तव्यावर असताना छातीत दुखू लागले. काही वेळातच ते कार्यालयात कोसळले. बेशुद्धावस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.याबाबत अधिक माहिती अशी की, उपनिरीक्षक प्रतापराव भुजबळ वाचक शाखेत कार्यरत होते. राज्यपाल रमेश बैस आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्या कोल्हापूर दौ-याच्या बंदोबस्त तयारीची लगबग सध्या पोलिस दलात सुरू आहे. याच गडबडीत असताना शनिवारी दुपारी उपनिरीक्षक भुजबळ यांच्या छातीत दुखू लागले. अस्वस्थ वाटू लागल्याचे त्यांनी सहका-यांना सांगितले. मात्र, काही वेळातच ते कोसळले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पुन्हा त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर खासगी रुग्णालयातून त्यांना सीपीआरमध्ये हलवण्यात आले. सीपीआरमध्ये उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह भुजबळ यांच्या मूळ गावी पाठविण्यात आला. भुजबळ यांचे लहान बंधू विकास भुजबळ हे कोल्हापुरात पोलिस निरीक्षक आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. उपनिरीक्षक भुजबळ यांच्या निधनाची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, निकेश खाटमोडे-पाटील, शहर उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक तानाजी सावंत, सतीशकुमार गुरव, अविनाश कवठेकर यांनी सीपीआरमध्ये धाव घेऊन भुजबळ कुटुंबीयांचे सांत्वन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसHeart Attackहृदयविकाराचा झटका