शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीबाबत लाचप्रकरणातील तक्रारदार मित्रासह पोलीसात हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 12:38 IST

बांदिवडे (ता. पन्हाळा) येथील जंगलातील वृक्षतोडीबाबत लाचप्रकरणी वनरक्षक महेशकुमार आंबी यांच्याविरोधात तक्रार देऊन खोटे पुरावे रचणारा संशयित तक्रारदार अभिमन्यू अर्जुन पाटील (वय ३५, रा. बांदिवडे) व त्याचा साथीदार अमित बाळासो येडगे (२७, रा. कणेरीपैकी धनगरवाडा, ता. पन्हाळा) हे दोघेजण स्वत:हून शिरोली एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात सोमवारी हजर झाले.

ठळक मुद्देलाचप्रकरणातील तक्रारदार मित्रासह पोलीसात हजरपन्हाळ्याचा वनरक्षकाकडून लाच मागणी प्रकरण

कोल्हापूर : बांदिवडे (ता. पन्हाळा) येथील जंगलातील वृक्षतोडीबाबत लाचप्रकरणी वनरक्षक महेशकुमार आंबी यांच्याविरोधात तक्रार देऊन खोटे पुरावे रचणारा संशयित तक्रारदार अभिमन्यू अर्जुन पाटील (वय ३५, रा. बांदिवडे) व त्याचा साथीदार अमित बाळासो येडगे (२७, रा. कणेरीपैकी धनगरवाडा, ता. पन्हाळा) हे दोघेजण स्वत:हून शिरोली एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात सोमवारी हजर झाले.संशयित तक्रारदार अभिमन्यू पाटील यांनी पन्हाळा विभागातील वनरक्षक महेशकुमार बाबूराव आंबी यांनी २००० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार १८ सप्टेंबर २०१९ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूरकडे संपर्क साधून नोंदविली होती.

कारवाईवेळचा आंबी यांचा ध्वनिमुद्रित आवाज व पडताळणीवेळी ध्वनिमुद्रित असलेला आवाज यांमध्ये तफावत जाणवली. त्यावर प्रत्यक्ष हॉटेल श्रावणी येथे जाऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.

त्यामध्ये आंबी हजर नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच तक्रारदार अभिमन्यू पाटील व त्यांचा मित्र अमित येडगे हे या हॉटेल परिसरात बोलत असल्याचे कॅमेऱ्यात दिसले. तसेच जप्त केलेल्या मेमरी कार्डमधील संभाषणाचा पुणे प्रादेशिक न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालात आंबी यांच्या अहवालात अमित येडगे हा तक्रारदाराशी बोलण्याचे निष्पन्न झाले.

खोटे पुरावे रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची फसवणूक केलेप्रकरणी संशयित पाटील व येडगे यांचे विरोधात शिरोली एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झालेपासून दोघेजण पसार होते.

सोमवारी ते सकाळी अकराचे सुमारास शिरोली पोलीस ठाण्यात हजर झाले. येथील पोलीसांनी एसीबीला कळविलेनंतर त्यांच्या टिमने त्यांना ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत त्यांचेकडे कसून चौकशी करीत आहेत. 

 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणforest departmentवनविभागPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर