शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

फिल्मिंग लावणाऱ्या वाहनांवर कारवाई कठोर करणार : पोलीस निरीक्षक अनिल गुजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 10:49 IST

वाहनांच्या विंडस्क्रीन व दरवाजांच्या खिडक्यांच्या काचांवर काळ्या फिल्म लावणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी फिल्मिंग लावले असेल तर ते काढून टाकावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी दिली.

ठळक मुद्देफिल्मिंग लावणाऱ्या वाहनांवर कारवाईकारवाई कठोर करणार : पोलीस निरीक्षक अनिल गुजर

कोल्हापूर : वाहनांच्या विंडस्क्रीन व दरवाजांच्या खिडक्यांच्या काचांवर काळ्या फिल्म लावणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी फिल्मिंग लावले असेल तर ते काढून टाकावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी दिली.वाहनांचे विंडस्क्रिन आणि खिडक्यांच्या काचांवर लावण्यात येणाºया काळ्या फिल्म काढून टाकण्याबाबत आणि अशा वाहनांवर कठोर कारवाईचे आदेश राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी सर्व पोलीस घटकांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात जनहित याचिकेत दिलेल्या आदेशाचे राज्यस्तरावरून पालन करण्यात येत आहे. त्यानुसार कोल्हापुरात कारवाई मोहीम राबविण्याचा निर्णय शहर वाहतूक शाखेने घेतला आहे.महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या, तसेच सुरक्षेच्या कारणास्तव झेड आणि झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आलेल्या व्यक्तींच्या वाहनांना सवलत देण्यात आली आहे. इतर शासकीय, निमशासकीय, खासगी वाहनांवर फिल्मिंग लावणाºया चालकांवर केंद्रीय मोटर वाहन अधिनियम १९८९ नियम १०० (२) प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.

कोल्हापुरात यापूर्वीही फिल्मिंग लावणाºया वाहनांवर दंडात्मक कारवाई केली होती. जागेवर फिल्मिंग काढून टाकल्या जात होत्या. ही कारवाई थंडावल्यानंतर पुन्हा वाहनांना फिल्मिंग लावण्यात आले. जिल्ह्यात बहुतांशी वाहने फिल्मिंग लावून फिरताना दिसतात. शहर वाहतूक शाखेच्यावतीने ही कारवाई मोहीम कडक करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक गुजर यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर