शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

‘लिडकॉम’ केंद्रातून पोलिसांचे बूट, बेल्ट तयार होणार-सुरेश खाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:26 IST

संत रोहिदास चर्माेद्योग व चर्मकार विकास महामंडळा (लिडकॉम)च्या कोल्हापुरातील उत्पादन केंद्रातून पोलिसांचे बूट, बेल्ट तयार करून कारागिरांच्या कामाला हमी दिली जाईल, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली. चर्मोद्योग शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचा हा पुणे विभागातील पहिला प्रकल्प असून, अन्य सात विभागांतही तो राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे‘लिडकॉम’ केंद्रातून पोलिसांचे बूट, बेल्ट तयार होणार चर्मोद्योग शिक्षण, प्रशिक्षण केंद्राचा पहिला प्रकल्प कोल्हापुरात

कोल्हापूर : संत रोहिदास चर्माेद्योग व चर्मकार विकास महामंडळा (लिडकॉम)च्या कोल्हापुरातील उत्पादन केंद्रातून पोलिसांचे बूट, बेल्ट तयार करून कारागिरांच्या कामाला हमी दिली जाईल, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली. चर्मोद्योग शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचा हा पुणे विभागातील पहिला प्रकल्प असून, अन्य सात विभागांतही तो राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.सुभाषनगर येथील संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या चर्मोद्योग, शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या जागेचे भूमिपूजन व इमारत नकाशाच्या अनावरणप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, ‘लिडकॉम’चे संचालक माजी आमदार बाबूराव माने, राजेश खाडे, दत्तात्रय गोतीसे, सरोज भिसुरे, व्यवस्थापक सुभाष भोगे, जिल्हा व्यवस्थापक एन. एम. पवार, व्ही. एस. चव्हाण, अमोल शिंदे, नगरसेविका सविता घोरपडे, अबकारी विभागाचे उपायुक्त गणपत चौगुले, आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री खाडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले.डॉ. खाडे म्हणाले, ‘या उद्योगात इतर समाज मोठ्या प्रमाणात उतरला आहे. चर्मकार समाजानेही विशेषत: युवकांनी आता दोन पावले पुढे आले पाहिजे. शासनही दोन पावले पुढे यायला तयार आहे. हस्तकलेला प्राधान्य असून, कोल्हापूरजवळच्या कर्नाटक, गोवा राज्यांमध्येही कोल्हापुरी चप्पलचा उद्योग वाढविला पाहिजे. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग नेहमीच पाठीशी राहील.

मुद्रा योजना, विविध महामंडळे यांच्या माध्यमातून बेरोजगारांना उद्योजक बनविण्यासाठी पंतप्रधानांनी प्राधान्याने योजनांची अंमलबजावणी केली आहे. ‘लिडकॉम’च्या माध्यमातून अल्प व्याजदरावर उद्योजकांना कर्ज देण्यात येते. त्याच लाभ घ्यावा.’संजय पवार, महेश जाधव, दुर्वास कदम, बाबूराव माने, आदींनी मनोगत व्यक्त केले. ‘लिडकॉम’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश ढाबरे यांनी स्वागत केले. वित्तीय सल्लागार हणमंत कांबळे यांनी आभार मानले. यावेळी सुभाष रामुगडे, अशोक गायकवाड, रघुनाथ मोरे, अरुण सातपुते, कृष्णात चौगले, आदी उपस्थित होते.प्रत्येक जिल्ह्यात संत रोहिदास स्मारकशासनाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त प्रत्येक तालुक्याला १00 मुलांसाठी आणि १00 मुलींसाठी निवासी वसतिगृहे, तर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्याला स्मारक उभे करण्यात येत आहे.

या धर्तीवर संत रोहिदास महाराज यांचे साडेअकरा कोटींचे स्मारक प्रत्येक जिल्ह्याला उभे करण्यात येणार आहे, असे मंत्री खाडे यांनी सांगितले. त्याचबरोबर केंद्र सरकारतर्फे विविध योजनांच्या माध्यमातून १२७६ कोटी मंजूर करून आणले आहेत, तसेच ३०० गटई कामगारांसाठी स्टॉल दिले असून, आणखी १३ हजारजणांना दिले जातील, असेही ते म्हणाले.

गेले ६0 वर्षे समाजाला वाऱ्यावर सोडलेया प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेल्या युवकाला शासनाने वाºयावर सोडू नये, असे दुर्वास कदम यांनी सांगितले. याचा संदर्भ घेत मंत्री खाडे यांनी गेली ५0-६0 वर्षे काहींनी समाजाला वाºयावर सोडले; पण आताच्या सरकारने समाजाला सर्व उपलब्ध करून दिले आहे, असा टोला कदम यांच्याकडे पाहून लगावला. या प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम एक एकर जागेत तीन हजार चौ. मी.मध्ये केले जाईल. त्यासाठी साडेपाच कोटींची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर