शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
4
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
5
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
6
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
7
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
8
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
9
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
10
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
11
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
12
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
13
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
15
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
16
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
17
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
18
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
19
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
20
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 

पोलीसच बनले नकली ग्राहक

By admin | Updated: February 23, 2015 23:55 IST

कातडी विक्रीचा पर्दाफाश : अरुण कदमने घेतले पावशीतून वाघाचे कातडे

सावंतवाडी : कलंबिस्तच्या ग्रामसेवकाने आजऱ्यात वाघाच्या कातड्यासाठी शोधलेले गिऱ्हाईक फुटल्याने कातडे विक्री प्रकरणाचा पर्दाफाश झाला. वाघाच्या कातड्यासाठी पोलीसच ग्राहक बनले आणि संशयितांना जेरबंद केले. याप्रकरणी आजरा पोलीस कुडाळ पावशी येथील एका व्यक्तीच्या शोधात असून, त्यानेच हे कातडे शिवापूर येथील अरुण कदम यांच्याकडे दिल्याचे पोलिसांच्या तपासांत उघड झाले आहे.कलंबिस्तमधील तिघांसह शिवापूर येथील एकाला आजरा पोलिसांनी रविवारी पट्टेरी वाघाचे कातडे विकताना रंगेहात पकडले. चार महिन्यांपूर्वीच पोलिसांनी सांगेली कलंबिस्त येथील तिघांना बिबट्याच्या कातडीप्रकरणी अटक केली होती.तेव्हापासून हा परिसर चांगलाच चर्चेत आला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड तसेच वन्य प्राण्यांची हत्या होत असून, वनविभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. शिवापूर येथील अरुण कदम याने पावशी येथील एका व्यक्तीकडून काही वर्षांपूर्वी हे कातडे घेतले होते. कदम यांची ओळख कलंबिस्त येथील किरण सावंत या युवकाशी झाली. त्याने कातड्याबद्दल कलंबिस्तचे ग्रामसेवक प्रल्हाद पाटील याला सांगितले आणि कट शिजला. मूळ साळगाव (ता. आजरा) येथील ग्रामसेवक पाटील यांनी आपल्याकडे ग्राहक असल्याचे सांगत मध्यस्थ म्हणून सुलगाव येथील एका युवकाला हाताशी धरले. गेले चार दिवस हे कातडे विकण्याचा घाट घातला जात होता. ठरल्याप्रमाणे रविवारी किरण सावंत याने आपल्या इनोव्हा कारमधून कातड्यासह गावातीलच अशोक राऊळ व पुंडलिक कदम या दोघांना घेतले आणि सकाळी आजरा येथे जाण्यास निघाले. आजरा येथे पोहोचल्यानंतर ग्रामसेवक पाटील व त्याचा साथीदार बाळकृष्ण देऊलकर याच्यासोबत आजरा येथील एका हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरले.याची कुणकुण लागल्याने सुलगाव येथील युवकाने पोलिसांना अलर्ट केले होते. आजरा पोलीस स्वत:च याप्रकरणी नकली ग्राहक बनले आणि आजरा येथील हॉटेलमध्ये दबा धरून बसले. किरण सावंतसह चारजण इनोव्हाने हॉटेलमध्ये दाखल झाले. पाठोपाठ प्रल्हाद पाटील व बाळकृष्ण देऊलकर तेथे आले आणि त्यांच्यात कातड्याच्या देवाण-घेवाणीची चर्चा सुरू असतानाच पोलिसांनी सर्वांना रंगेहात पकडले.शिकारी मोकाट, वनविभाग कोमातमहाराष्ट्रात पट्टेरी वाघाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तशीच परिस्थिती सिंधुदुर्गमध्ये आहे. नव्या गणनेनुसार सिंधुदुर्गमध्ये दोन पट्टेरी वाघ आहेत आणि अशातच पट्टेरी वाघाची हत्या होत राहिली तर एक दिवस देशातील पट्टेरी वाघच संपून जातील. तसेच सह्याद्रीच्या पायथ्याला मोठ्या प्रमाणात शिकारी होतात आणि हे शिकारीही मोकाट सुटले आहेत; मात्र वनविभाग गप्प असून, अधिकारी कोमात असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. (प्रतिनिधी)आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीआजरा येथे रविवारी पकडण्यात आलेल्या वाघाच्या कातड्याच्या विक्री प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून, यातील सहा आरोपींना आजरा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता सर्वांना गुरुवार (दि. २६) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.अटक केलेल्यांमध्ये किरण सखाराम सावंत (वय ३७, रा. कलंबिस्त, गणेशवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), अशोक वासुदेव राऊळ (५४, रा. कलंबिस्त दुर्गवाडी, ता. सावंतवाडी) व ग्रामसेवक प्रल्हाद बाळासाहेब पाटील (मूळ गाव साळगाव, ता. आजरा) यांच्यासह अरुण महादेव कदम (रा. शिवापूर, ता. कुडाळ), पुंडलिक तुकाराम कदम (रा. वेरले, ता. सावंतवाडी) व बाळकृष्ण सदाशिव देवलकर (३८, रा. साळगाव, ता. आजरा) यांचा समावेश आहे.अहवाल येताच ग्रामसेवकाचे निलंबनया प्रकरणात ग्रामसेवक प्रल्हाद पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात येणार आहे. पोलिसांनी आपला अहवाल आम्हाला देताच पाटील यांच्यावर कारवाई होईल, अशी माहिती गटविकास अधिकारी शरद महाजन यांनी दिली.