शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी पोलिसाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 18:37 IST

पोलीस ठाण्यात जबाब देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलिसाने विनयभंग केला. चेतन दिलीप घाटगे (वय ३४, रा. मंडलिक पार्क, कोल्हापूर) असे त्याचे नाव असून, त्याच्यावर ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी पोलिसाला अटक‘पोक्सो’ कायद्याखाली गुन्हा नोंद : राजारामपुरी पोलीस ठाण्यातील प्रकार

कोल्हापूर : पोलीस ठाण्यात जबाब देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलिसाने विनयभंग केला. चेतन दिलीप घाटगे (वय ३४, रा. मंडलिक पार्क, कोल्हापूर) असे त्याचे नाव असून, त्याच्यावर ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, राजारामपुरी पोलीस ठाण्यात ५ मे २०१९ ला अल्पवयीन मुलगीला फूस लावून पळवून नेल्याबाबतचा गुन्हा नोंद झाला आहे. त्यातील अल्पवयीन मुलगी १४ मे रोजी पोलीस ठाण्यात हजर झाली. यावेळी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी माळी या सुट्टीवर असल्याने दुसऱ्या अधिकाऱ्यांना याबाबत जबाब घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.

यावेळी संबंधित मुलीच्या पालकांना बोलावून घ्या, ते न आल्यास तिला बालसुधारगृहात पाठवा, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार एक महिला पोलीस कॉन्स्टेबल व पोलीस नाईक चेतन दिलीप घाटगे यांनी त्या अल्पवयीन मुलीचे जबाब घेतले. दुसऱ्या दिवशी १५ मे रोजी त्या मुलीची आरोग्य तपासणी करण्यात आली.

दरम्यान, तिने जबाबावेळी घाटगे याने आपल्याशी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून तिच्या आईने याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याची शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी शहानिशा केली.त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता घाटगेविरोधात विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. त्याचबरोबर पहाटे पाच वाजता त्याला अटक करण्यात आली. दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपास पोलीस करत आहेत.

अंतर्गत वादातून घाटगेला गोवल्याची चर्चापोलीस नाईक घाटगे हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असून, याच पोलीस ठाण्यातील अंतर्गत वादातून त्याला गोवण्यात आल्याची चर्चाही पोलीस वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.

राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक चेतन घाटगे याच्याविरोधात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल.- डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर