शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाद वाटपातून विषबाधा, शंभरहून अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल; कोल्हापूर जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 13:41 IST

राजेंद्र पाटील भोगावती : परिते ता. करवीर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदीरामध्ये सुरु असलेल्या हरिनाम सप्ताह निमित्ताने केलेल्या प्रसाद वाटपामधून विषबाधा ...

राजेंद्र पाटीलभोगावती : परिते ता. करवीर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदीरामध्ये सुरु असलेल्या हरिनाम सप्ताह निमित्ताने केलेल्या प्रसाद वाटपामधून विषबाधा झाल्याची घटना घडली. यातील तब्बल शंभरहून अधिक रुग्णांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.परिते येथे सोमवारपासून हरिनाम सप्ताह सुरु आहे. यामध्ये ज्ञानेश्वरीचे वाचन करण्यासाठी पन्नासहून अधिक वारकरी तसेच गावातील युवक मंडळी वाचनासाठी मंदिरामध्ये बसतात. या वाचकांसाठी आठ दिवसांमध्ये गावातील इच्छुक तसेच दानशूर व्यक्तींच्याकडून महाप्रसादाचे आयोजन केले जाते.सोमवारी सकाळी गावातील शंभरहून अधिक मंडळींनी भात भाजी आमटी तसेच बासुंदी असा महाप्रसाद घेतला. महाप्रसाद घेतल्यानंतर मंगळवारी दुपारनंतर यासर्वांना उलटी, जुलाबचा त्रास सुरु झाला. हळुहळू रुग्णांची संख्या वाढत गेली. हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच तात्काळ ग्रामपंचायतच्या वतीने आरोग्य विभागाला कल्पना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तात्काळ परिते गावातील घराघरात आणि प्राथमिक शाळेत माहिती घेतली. यामध्ये आत्तापर्यंत  शंभर पेक्षा अधिक जणांना प्रसादातून विषबाधा झाल्याचे आढळून आले. रुग्णांवर राशिवडे, ठिकपुर्ली, इस्पुर्ली, सी.पी.आरमध्ये उपचार सुरु आहेत.दूधजन्य पदार्थातूनच विषबाधा झाल्याची शक्यता आहे. प्राथमिक उपचार म्हणून गावामध्ये एक युनिट उभा केला असून गंभीर रुग्णास सरकारी दवाखान्यात उपचारासाठी हलवले जात आहे. एकूणच सर्वच रुग्णांची प्रकृती बरी असल्याचे यावेळी सरपंच मनोज पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल