शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पी.एन. पाटील यांच्या आग्रहामुळेच ‘मल्टिस्टेट’चा प्रस्ताव मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 16:57 IST

माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मात्र ‘पी. एन. सांगतील त्यानुसार निर्णय घ्या,’ असे सांगितल्याने संचालक मंडळाने मल्टिस्टेटचा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

ठळक मुद्देपी.एन. पाटील यांच्या आग्रहामुळेच ‘मल्टिस्टेट’चा प्रस्ताव मागे‘गोकुळ’चे राजकारण : धनंजय महाडिक यांचा होता विरोध

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) मल्टिस्टेटचा प्रस्ताव आमदार पी. एन.पाटील यांनी आग्रह धरल्यामुळेच संचालक मंडळाने रद्द केला असल्याची माहिती पुढे आली आहे. हा प्रस्ताव रद्द करण्याची गरज नाही.

मल्टिस्टेटला मंजुरी मिळाल्यास आपल्याला निवडणुकीच्या आधी महिनाभर केलेल्या सभासदांनाही कायद्यान्वये मतदान करता येईल, असे सांगून माजी खासदार धनंजय महाडिक यांचा हा प्रस्ताव मागे घेण्यास विरोध होता; परंतु माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मात्र ‘पी. एन. सांगतील त्यानुसार निर्णय घ्या,’ असे सांगितल्याने संचालक मंडळाने प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.‘मल्टिस्टेट’ला सभासदांतून प्रचंड विरोध होताच; शिवाय राज्य शासनाकडूनही त्यासाठी संबंधित मंत्र्यांचे फारच हातपाय धरावे लागत होते. त्यासाठीची ‘डिमांड’ही मोठी होती. त्यामुळे हे काहीच करायला नको आणि सभासदांनाच मल्टिस्टेट नको असेल तर आपण दाबून काही करायला गेलो तर त्याचा फटका बसेल, अशी चर्चा मागच्या चार महिन्यांपूर्वीच झाली. त्यावेळी पाच ज्येष्ठ संचालकांनीही मल्टिस्टेटला विरोध केला होता.

संचालक मंडळाने एकत्रित हा प्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर करायचे नेत्यांसमवेत झालेल्या चर्चेत ठरले होते; परंतु त्यावेळी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी घाईगडबडीत प्रसिद्धिपत्रक काढून मल्टिस्टेट रद्द न केल्यास राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. त्याचा महादेवराव महाडिक यांना राग आला व ‘राजीनाम्याची भीती कुणी घालू नये,’ असा टोला महाडिक यांना लगावला व त्यावरून हा विषय त्यावेळी मागे पडला.

विधानसभा निवडणुकीत करवीर मतदारसंघात हा मुद्दा काही प्रमाणात चर्चेस आला; परंतु त्याचा मतदानावर फारसा परिणाम झाला नाही; कारण संघाच्या सत्तारूढ आघाडीचे नेते पी.एन. पाटील हे या मतदारसंघातून विजयी झाले. विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची चांगली दिलजमाई झाल्यानेही आमदार पाटील हे विजयी झाले.

त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी थेट पी. एन. यांनाच फोन करून ‘हा प्रस्ताव मागे घ्या, आम्ही संघाच्या सभेला येत नाही,’ असे सुचविले. त्यानुसार पी. एन. यांनी महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही त्यास संमती दिली; परंतु माजी खासदार महाडिक यांची मात्र त्यास तयारी नव्हती. त्यातून धनंजय महाडिक व पी. एन.पाटील यांच्यामध्ये किरकोळ शाब्दिक वाद झाला.

मल्टिस्टेटचा फायदा असल्याचे धनंजय महाडिक यांचे म्हणणे होते. या निर्णयाचा काडीमात्र फायदा होणार नाही. सभासदांत नाराजी असल्याने झालाच तर तोटा होईल; तेव्हा हा प्रस्तावच रद्द करण्यात यावा, या भूमिकेवर पी. एन. ठाम राहिले. त्यास महादेवराव महाडिक यांनी पाठबळ दिल्यावर संचालक मंडळाने प्रस्ताव रद्द करण्यात येत असल्याचेच प्रसिद्धिपत्रक काढले. 

 

टॅग्स :Gokul MilkगोकुळPoliticsराजकारणP. N. Patilपी. एन. पाटीलMahadevrao Mahadikमहादेवराव महाडिकDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक