शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पीएन पाटील यांचा भोगावती कारखान्याचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 18:49 IST

bhogawati, sugerfactory, p.n.patil, kolhapurnews परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाचा मंगळवारी सकाळी राजीनामा दिला. परंतू हा राजीनामा अद्याप संचालक मंडळाने स्विकारलेला नाही. आमदार पाटील यांनीच अध्यक्षपद कायम राहावे असा त्यांचा आग्रह आहे. आमदार पाटील राजीनामा पत्र देवून कारखान्यांवरून कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.

ठळक मुद्देराजीनामा स्विकाररण्यास संचालकांचा विरोध अन्य कामे करण्यात वेळ देता येत नसल्याने निर्णय

विश्र्वास पाटीलकोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाचा मंगळवारी सकाळी राजीनामा दिला. परंतू हा राजीनामा अद्याप संचालक मंडळाने स्विकारलेला नाही. आमदार पाटील यांनीच अध्यक्षपद कायम राहावे असा त्यांचा आग्रह आहे. आमदार पाटील राजीनामा पत्र देवून कारखान्यांवरून कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.

कारखान्यासाठी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खूप चांगले सहकार्य केले, त्यामुळे कारखाना चांगला चालवू शकलो, अशी भावना आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे. आमदार पाटील हे गेली सव्वा तीन वर्षे कारखान्याचे अध्यक्ष आहेत. कारखान्याचा अध्यक्ष म्हणून तेथील प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घालावे लागते त्यामध्ये जास्त वेळ द्यावा लागत असल्याने आमदार म्हणून मतदार संघातील विकास कामांचा पाठपुरावा, राजीवजी सूतगिरणीची कामे मार्गी लावण्याकडे पुरेसा वेळ देता येत नाही हे राजीनामा देण्यामागील कारण आहे. कारखान्याच्या ६३ वर्षाच्या इतिहासात स्वत:हून कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीरामा देणारे आमदार पाटील हे पहिले अध्यक्ष आहेत.

कारखान्याचे राजकारण गेली पंचवीस वर्षे मी पाहत आहे त्यावेळी मी कुठे अध्यक्ष होतो त्यामुळे आता मीच कशाला अध्यक्ष पाहिजे. मी माझ्या अन्य कामांमध्ये लक्ष घालतो आणि कारखान्याला सगळी मदत करत राहणारच फक्त तुमच्यातील कोणीतरी ही जबाबदारी घ्या असे आमदार पाटील यांचे म्हणणे आहे. परंतू संचालक त्यांचे ऐकायला तयार नाहीत.

तुमच्यामुळे कारखाना गेल्या तीन वर्षात रुळावर आला आहे. सभासदांनी कारखान्याची सुत्रेही तुम्ही नेतृत्व करणार म्हणून दिली आहेत त्यामुळे तुमचा राजीनामा आम्ही मंजूर करणार नाही असे सर्व २२ संचालकांचा एकमुखी आग्रह आहे. त्यामुळे यातून काय निर्णय होतो हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर