शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

‘माणुसकीची भिंत’ उपक्रमास कोल्हापुरात उदंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 19:51 IST

कोल्हापुरातील सीपीआर चौकात शनिवारी ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाचा शनिवारी नागरिकांच्या उदंड प्रतिसादात प्रारंभ झाला. माणुसकीचे दर्शन घडवित दिवसभरात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत असे तब्बल ३५ हजारांहून अधिक चांगले कपडे या उपक्रमासाठी जमा झाले आणि दुसरीकडे त्या कपड्यांचे गरजूंना वाटपही झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. रविवारीदेखील हा उपक्रम सुरू राहणार आहे.

ठळक मुद्देउपक्रमाचा नागरिकांच्या उदंड प्रतिसादात प्रारंभ तब्बल ३५ हजारांहून अधिक चांगले कपडे जमा सीपीआर चौकात भव्य मंडपरितेश देशमुख यांची उपस्थिती

कोल्हापूर, दि. १४ : गरीब, श्रीमंत,लहान, मोठा असे सगळे भेदाभेद विसरून सगळ्यांच्या आयुष्यात प्रकाशोत्सवाचे रंग भरणाऱ्या दिवाळीचा आनंद गरजू कुटुंबांनाही मिळावा या उद्देशाने सुरू झालेल्या ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाचा शनिवारी नागरिकांच्या उदंड प्रतिसादात प्रारंभ झाला. माणुसकीचे दर्शन घडवित दिवसभरात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत असे तब्बल ३५ हजारांहून अधिक चांगले कपडे या उपक्रमासाठी जमा झाले आणि दुसरीकडे त्या कपड्यांचे गरजूंना वाटपही झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.  रविवारीदेखील हा उपक्रम सुरू राहणार आहे.

गोरगरिबांची दिवाळी आनंंदाने साजरी व्हावी, त्यांना किमान नवे-जुने वापरण्यायोग्य कपडे मिळावेत, या उद्देशाने गतवर्षी सुरू झालेल्या या उपक्रमाला कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला होता. यंदाही सीपीआर चौकात उभारण्यात आलेल्या या भव्य मंडपात सकाळी दहा वाजता आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात झाली.

वापरात नसलेले चांगले कपडे गरजूंसाठी देण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी सुरू झाली. स्वच्छ धुऊन इस्त्री केलेल्या कपड्यांनी भरलेल्या पिशव्या गाडीवरून घेऊन सर्वसामान्यांपासून ते उच्चभू्रंपर्यंतचे सर्व नागरिक सीपीआर चौकात येत होते. लहान मुलांचे कपडे, साड्या, पँट, शर्ट, ब्लँकेट, शाल, स्वेटर्स, अशा अनेकविध प्रकारच्या कपड्यांची विभागणी करून उपस्थित संयोजक व कार्यकर्त्यांना दिले जात होते.

दुसरीकडे जमा झालेले हे कपडे गरजू महिला, पुरुष व लहान मुलांना वितरित केले जात होते. ‘नको असेल ते द्या आणि हवे ते घेऊन जा’ या आवाहनानुसार अनेकजण हवे असलेले कपडे घेऊन जात होते. या ‘माणुसकीच्या भिंती’साठी अक्षरश: नागरिकांच्या संवेदनांचा झराच यानिमित्ताने पाहायला मिळाला. एकीकडे समाजाच्या निष्ठुरतेचा अनुभव येत असताना दुसरीकडे स्वयंस्फूर्तीने उपक्रमासाठी दिलेला सहभाग समाधान देणारा ठरला.

दुपारनंतर प्रतिमा पाटील यांनी या उपक्रमासाठी हजेरी लावली व स्वत: मंडपात उभे राहून कपड्यांचे वितरण केले. या उपक्रमाच्या संयोजनासाठी आमदार सतेज पाटील यांच्या मदतीने सुधर्म वाझे, गणी आजरेकर, सचिन पाटील, प्रशांत पोकळे, प्रसाद पाटील, अमर पाटील, सूरज पाटील, निनाद कामत, इम्तियाज मोमीन, डॉ. देवेंद्र रासकर, यांच्यासह अनेकजण पुढाकार घेऊन परिश्रम घेत आहेत. आज, रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रितेश देशमुख यांची उपस्थितीदरम्यान, एका चित्रपटाच्या प्रमोशनच्यानिमित्ताने कोल्हापुरात आलेले अभिनेते रितेश देशमुख यांनी सायंकाळी मंडपात हजेरी लावली. आमदार सतेज पाटील यांच्यासमवेत त्यांनी गरजूंना कपडे वितरित केले. समाजानेच समाजासाठी चालविलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून, त्याचे राज्यभर अनुकरण झाले पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. देशमुख यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

चपलांसाठी आवाहनया उपक्रमासाठी कपडे मोठ्या प्रमाणात आले असले तरी वंचित मुलांना चपलांचीदेखील भ्रांत असते. त्यामुळे लहान मुला-मुलींसाठी कपड्यांबरोबरच चांगले वापरातले (न तुटलेले) किंवा नवीन चप्पल, बूट, सँंडल असतील तर ते उपक्रमस्थळी आणून द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

कपडे व साहित्य वाटपामुळे आज मी माझ्यासाठी व कुटुंबीयांसाठी चांगले कपडे घेऊ शकलो. आम्हा गोरगरिबांचे आशीर्वादच सगळ्यांना लागतील.गुलाब जमादार

महागाई इतकी वाढली आहे की, दिवाळीसाठी नवीन कपडे घेतानाही अनेकवेळा विचार करावा लागतो. सणाला असे चांगले कपडे मिळणे हीदेखील आमच्यासाठी दिवाळीच आहे.संपदा राऊत

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRitesh Deshmukhरितेश देशमुख