शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिर संरक्षित स्मारक संबंधी म्हणणे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 14:51 IST

कोल्हापूर : कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यासंबंधीचे म्हणणे २९ तारखेपर्यंत सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ...

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचे राज्य शासनाला आदेश : अन्यथा १५ हजारांचा दंड

कोल्हापूर : कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यासंबंधीचे म्हणणे २९ तारखेपर्यंत सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. मंदिरासंबंधी १९९६ साली काढण्यात आलेल्या अधिसूचनेसंबंधी शासनाकडून होत असलेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त करत दिलेल्या मुदतीत शासनाने म्हणणे सादर न केल्यास १५ हजारांचा दंड केला जाईल, अशी ताकीद देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील देवता असलेल्या अंबाबाई मंदिराच्या अस्तित्वाचे दाखले दोन हजार वर्षांपासूनचे मिळतात. मंदिर व वास्तूरचनेचा उत्कृष्ट नमूना असलेले हे मंदिर अद्याप राज्य संरक्षित स्मारक नाही. मंदिराचा संरक्षित स्मारकमध्ये समावेश व्हावा; यासाठी राज्यशासनाने ४ आॅक्टोबर १९९६ रोजी कलम ४ नुसार प्राथमिक अधिसूचना जाहीर करून हरकती मागविल्या होत्या. मात्र त्यानंतर मंदिराची अंतिम अधिसूचना जाहीर करण्यात आली नाही.

ही अधिसूचना अंतिम करण्यात यावी; यासाठी श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी २०१४ साली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर २२ तारखेला न्यायाधीश के. के. तातेड व न्यायाधीश एस. व्ही. कोतवाल यांच्यासमोर सुनावणी झाली. या प्रकरणात महाराष्ट्र शासनाने आपले म्हणणे सादर केलेले नाही. या विलंबाबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करत शुक्रवार (दि. २९)पूर्वी आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दिलेल्या वेळेत म्हणणे सादर न केल्यास महाराष्ट्र शासनाला १५ हजार रुपयांचा दंड केला जाईल, अशी ताकीद देण्यात आली आहे. अ‍ॅड. तेजस दांडे हे याप्रकरणी कामकाज पाहत आहेत.पुरातत्व खाते म्हणणे मांडणार१९९६ सालल्या अधिसूचनेवर पुढील कार्यवाही न झाल्याने पुरातत्व खात्याने २०१६ साली पुन्हा अंबाबाई मंदिरासंबंधी प्राथमिक अधिसूचना जाहीर केली होती. त्यावर गजानन मुनीश्वर यांची हरकत वगळता सर्व हरकती निकालात काढण्यात आल्या आहेत; त्यामुळे २९ तारखेला म्हणणे सादर करताना २०१६ साली काढण्यात आलेल्या अधिसूचनेसंबंधीची माहिती न्यायालयापुढे सादर केली जाईल, अशी माहिती पुरातत्व खात्याचे संचालक तेजस गर्गे यांनी ‘लोकमत’ला दिली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर