शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नैवेद्य नदीला अन् पिशव्या कठड्याला, कोल्हापुरातील बालिंगा पुलावरील चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 16:48 IST

कचऱ्याचे अघोषित डंपिंग ग्राऊंड 

प्रकाश पाटीलकोपार्डे : भावना आणि धार्मिकता जोपासायला प्राधान्य देण्यात भारतीय लोकांच्यात चढाओढ सुरू असते पण यामुळे निसर्गाच्या चक्राला बाधा आणण्याचे कृत्य घडत असल्याचे चित्र बालिंगा पुलाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या लोखंडाच्या संरक्षक कटड्याकडे (रेलिंग)पाहिल्यास दिसत आहे. प्लास्टिक पिशव्यांची तोरणे बांधल्याचा प्रत्यय येत असून प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीला जनतेकडूनच खो घातला जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.राज्यात प्लास्टिक बंदीचा फतवा काढण्याचे काम सरकारने केले असले तरी जनतेचीच माणसिकता ही प्लास्टिक बंदी झुगारून टाकण्याचे काम करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा (ता. करवीर) येथे असणाऱ्या ब्रिटिश कालिन पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी रेलिंग आहे. येथे धार्मिकता जोपसणारे महाभाग पुलावर येतात आणि नेवैद्य व निर्माल्य अगदी बेमालूम नदीच्या पाण्यात फेकून देतात आणि निर्माल्य व नैवेद्द ज्या प्लास्टिक पिशवीतून आणले आहे ती पिशवी या लोखंडी रेलिंगला बांधून जातात. यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या रेलिंगला अक्षरशः प्लास्टिकचे तोरण बांधल्याची अनुभूती होते. काही पर्यावरण प्रेमी या पुलाचे सौदर्य नष्ट होऊ नये यासाठी या पिशव्या काढतात व नष्ट करतात. पुन्हा पंधरा दिवसांनी ही रेलिंग प्लास्टिक पिशव्यानी भरून गेलेली दिसतात यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

कचऱ्याचे अघोषित डंपिंग ग्राऊंड बालिंगा पुलाच्या पुर्वेला अघोषित कचऱ्याचे डंपिंग ग्राऊंड बनवले गेले असून या ठिकाणी शहर व उपनगरातील विविध प्रकारच्या कचऱ्यासह जैव कचराही येथे टाकला जात असून यावर कोणाचेही नियंत्रण नाही.

शहराच्या आरोग्याचा प्रश्न शहराला भोगावती नदीवरून पाणी पुरवठा करणारे पंप हाऊस बालिंगा पुलाजवळ. पुलाच्या पुर्वेला असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून वहाणारे ओघळ थेट पंपहाऊस जवळला जाऊन मिळाते. यामुळे शहराला पुरवठा होणारे पाणी अशुद्धच असते यामुळे शहराचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.त्याच बरोबर कोल्हापूर गगनबावडा मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना नाक हातात घेऊन प्रवास करावा लागत आहे.

बालिंगा पुल हे ऐतिहासिक आहे पण या पुलाच्या रेलिंगला अशा प्लास्टिक पिशव्या बांधल्याने ते खराब दिसत आहे. असे कृत्य करणाऱ्यांना वेळीच रोखायला हवे. - संजय पाटील

टॅग्स :kolhapurकोल्हापूर