शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शहरात विषारी वायू शोषणाऱ्या वृक्षांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 17:12 IST

कोल्हापूर महानगरपालिका आणि विविध सेवाभावी-स्वयंसेवी संस्‍थांच्या सहकार्याने रविवारी राबविलेल्या रस्ते, चौक, उद्याने स्वच्छ करण्याच्या मोहिमेत सुमारे दोन टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. तसेच स्वच्छता केलेल्या परिसरात औषध तसेच धूर फवारणीही करण्यात आली.

ठळक मुद्देशहरात विषारी वायू शोषणाऱ्या वृक्षांचे रोपण विविध भागांत स्वच्छता मोहीम, दोन टन कचरा उचलला

कोल्हापूर : महानगरपालिका आणि विविध सेवाभावी-स्वयंसेवी संस्‍थांच्या सहकार्याने रविवारी राबविलेल्या रस्ते, चौक, उद्याने स्वच्छ करण्याच्या मोहिमेत सुमारे दोन टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. तसेच स्वच्छता केलेल्या परिसरात औषध तसेच धूर फवारणीही करण्यात आली. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्वत: हातात झाडू घेऊन या परिसरातील स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.महानगरपालिका, स्वरा फौंडेशन आणि केआयटी कॉलेजतर्फे मध्यवर्ती बसस्थानक परिसर, दाभोळकर कॉर्नर परिसरात राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत हवा प्रदूषण रोखण्यासाठी विषारी वायू शोषून घेणारी झाडेही प्रशासक बलकवडे यांच्या हस्ते लावण्यात आली. तसेच वाहन चालविणाऱ्या नागरिकांना गुलाबफूल देऊन हवा प्रदूषण रोखण्यासाठीच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.रविवारी ८३ व्या स्वच्छता मोहिमेतून मध्यवर्ती बसस्थानक परिसरासह शहरातील प्रमुख चौक, रस्ते, गटारी, नाले, फूटपाथ, घाट तसेच उद्यानांमधील कचरा, प्लास्टिक, झाडांच्या फांद्या कट करणे, वृक्षलागवड, वॉल पेंटिंग तसेच स्वच्छता झाल्यानंतर त्या ठिकाणी औषध फवारणी करून परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यात आला. शहरात स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत दुर्मीळ तसेच औषधी वृक्षलागवड करून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देऊन नागरिकांना वृक्षारोपणाचे महत्त्व सांगण्यात आले.तसेच टाकाळा चौक ते उड्डाणपूल, तलवार चौक ते साने गुरुजी वसाहत बसस्टॉपपर्यंत, आयसोलेशन हॉस्पिटल मेन रोड, हॉकी स्टेडियम ते गोखले कॉलेज, पंचगंगा नदीघाट परिसर, तसेच जयंती नदी मैला-सांडपाणी पंपिंग स्टेशन, रेणुका मंदिर ते हॉकी स्टेडियम चौक रोडवरील कचरा व प्लास्टिक गोळा करण्याबरोबरच खुरटी झाडे, झुडपे आणि कचरा काढून हा परिसर स्वच्छ करण्यात आला. 

 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका