नाशिक : जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने शहरातील अनेक शाळा, शासकीय कार्यालये खासगी संस्था तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. मविप्रच्या मराठा हायस्कूलमध्ये रविवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्यासह व्यासपीठावर सामाजिक वनीकरण विभागाचे सहायक लागवड अधिकारी व मुख्याध्यापक अरुण पिंगळे उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सृष्टी म्हस्के हिने सर्व विद्यार्थ्यांना प्लास्टिक मुक्त पर्यावरण अभियानाची प्रतिज्ञा दिली, तर सिद्धेश पगार याने वैयक्तिक स्वच्छतेसोबतच परिसर स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. मुख्याध्यापकांनी जागतिक तपमान वाढीचे परिणाम, धोक्यात आलेली जैवविविधता याविषयी मार्गदर्शन करताना वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, जैवविविधता संवर्धन, ऊर्जा बचत, पाणी बचत, स्वच्छता मोहीम या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. मुख्याध्यापक अरुण पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व्ही. बी. म्हस्के यांनी केले, तर उपमुख्याध्यापक बी. आर. कहांडळ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
शहरात विविध संस्थांकडून वृक्षारोपण मोहीम
By admin | Updated: June 5, 2016 22:20 IST