शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

आवश्यकतेनुसार ऑक्सीजन जनरेशन प्लाँट उभारणीबाबत प्रशासनाने नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 17:11 IST

CoronaVirus In Kolhapur : कोविडची दुसरी लाट अजूनही जाणवत आहे, तत्पुर्वीच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला असून यामध्ये गाफीलपणा नको या उद्देशाने पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्ह्यातील प्राणवायू निर्मिती प्रकल्पांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.

ठळक मुद्देआवश्यकतेनुसार ऑक्सीजन जनरेशन प्लाँट उभारणीबाबत प्रशासनाने नियोजनजिल्ह्यातील प्राणवायू निर्मिती प्रकल्पांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

कोल्हापूर : कोविडची दुसरी लाट अजूनही जाणवत आहे, तत्पुर्वीच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला असून यामध्ये गाफीलपणा नको या उद्देशाने पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्ह्यातील प्राणवायू निर्मिती प्रकल्पांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.यावेळी पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, आवश्यकतेनुसार ऑक्सीजन जनरेशन प्लाँट उभारणीबाबत प्रशासनाने नियोजन केले आहे. कोडोली, आयजीएम येथील रिफलिंग आमदार निधीतून तर गडहिंग्लज आणि सीपीआरचे रिफलिंग हे डीपीडीसीतून करण्यात यावे.

त्याच बरोबर जलसंपदा (यांत्रिकी)चे अधीक्षक अभियंता विलास गायकवाड आणि जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी एकत्रित बसून ऑक्सीजन प्लाँन्टसाठी लोकप्रतिनिधींनी दिलेला जो निधी आहे तो निधी कसा वापरायचा याचे नियोजन करावे, अशी सूचनाही पाटील यांनी केली.ऑक्सीजन जनरेशन प्लाँट उभारणीच्या अनुषंगाने एमएससीबीचा, शेड उभारणी, जनरेटर त्याचबरोबर प्लाँट उभारणीबाबतचा विस्तृत आढावा पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला.याप्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्यासह आरोग्य विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcollectorजिल्हाधिकारीcommissionerआयुक्तkolhapurकोल्हापूर