शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पिंकथॉन’ च्या शेकडोजणी ‘लोकमत महामॅरेथॉन’ मध्ये धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 14:43 IST

कुस्तीची परंपरा जोपासणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी व संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला सहा जानेवारी २०१९ रोजी होणाऱ्यां ज्या स्पर्धेचे वेध लागलेले आहे, त्या ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्ड बाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’च्या थरारामध्ये ‘पिंकथॉन गु्रप’च्या शेकडो महिलाही सहभागी होऊन धावणार आहेत. तर तुम्हीही मागे राहू नका. तुम्हीही सहभागी होऊ शकता. महामॅरेथॉनसाठी नावनोंदणी सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या सर्वांत मोठ्या हाफ मॅरेथॉनमधील सहभागाबाबत नागरिक, धावपटू, खेळाडूंना मोठी उत्सुकता आहे.

ठळक मुद्देपिंकथॉन’ च्या शेकडोजणी ‘लोकमत महामॅरेथॉन’ मध्ये धावणार ‘लोकमत महामॅरेथॉन’साठी नावनोंदणीचा अखेरचा दिवस

कोल्हापूर : कुस्तीची परंपरा जोपासणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी व संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला सहा जानेवारी २०१९ रोजी होणाऱ्यां ज्या स्पर्धेचे वेध लागलेले आहे, त्या ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्ड बाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’च्या थरारामध्ये ‘पिंकथॉन गु्रप’च्या शेकडो महिलाही सहभागी होऊन धावणार आहेत. तर तुम्हीही मागे राहू नका. तुम्हीही सहभागी होऊ शकता. महामॅरेथॉनसाठी नावनोंदणी सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या सर्वांत मोठ्या हाफ मॅरेथॉनमधील सहभागाबाबत नागरिक, धावपटू, खेळाडूंना मोठी उत्सुकता आहे.औरंगाबाद आणि नाशिकमधील ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या प्रचंड यशानंतर आता कोल्हापूरमध्ये दुसºयांदा यावर्षी महामॅरेथॉन रंगणार आहे. ही मॅरेथॉन २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० किलोमीटर पॉवर रन, ५ किलोमीटर फन रन आणि ३ किलोमीटर फॅमिली रन अशा अंतराची असणार आहे. त्यातील विजेत्यांना मेडल आणि रोख रकमेच्या स्वरूपातील बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

‘लोकमत’ने कोल्हापूरकरांसह पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक, क्रीडाप्रेमींसाठी या महामॅरेथॉनच्या माध्यमातून एक चांगली संधी उपलब्ध करून दिली असल्याची भावना विविध क्षेत्रांतील मान्यवर, खेळाडू आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कोल्हापूरमधील शासकीय अधिकारी, नामवंत डॉक्टर्स, वकील, अभियंते आदींनी या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. महामॅरेथॉनमधील सहभागाबाबत कोल्हापूरकरांसह खेळाडू, धावपटूंमध्ये मोठी उत्सुकता आहे.‘पिंकथॉन गु्रप’ बद्दल आरोग्याबाबत महिलांमध्ये जागृती निर्माण व्हावी. या उद्देशाने देशपातळीवर अभिनेता व फिटनेस गुरू मिलिंद सोमण, अजित पाठक, वैष्णवी नायक यांनी दोन वर्षांपूर्वी ‘पिंकथॉन’ नावाच्या महिलांकरिता खास गु्रपची स्थापना केली. यात महिलांकरिता देशभरातील प्रमुख शहरांमध्ये पिंकथॉन वूमेन रनही आयोजित करण्यात आली होती.

त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात ही रन आयोजित करण्यात आली होती. त्यात शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यात शीतल संघवी, गीता लालवाणी, सुमित्रा खानविलकर, वैशाली संघवी, आरती संघवी, मंजिरी हसबनीस, रूपाली नांगरे-पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले होते. याच गु्रपमधील शेकडो महिला सहा जानेवारीला कोल्हापुरात होणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी होत आहेत.शहराचा नकाशा असणारे मिळणार ‘मेडल’या मॅरेथॉनमधील १० आणि २१ किलोमीटरची स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक धावपटूला कोल्हापूरचा नकाशा असलेले मेडल्स देण्यात येणार आहे. नाशिक आणि औरंगाबाद येथे झालेल्या मॅरेथॉनमधील धावपटूंना त्या-त्या शहराचा नकाशा असणारे मेडल्स दिली आहेत.

धावपटूने औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर आणि पुणे, नागपूरमधील मॅरेथॉन पूर्ण करून मिळविलेली मेडल्स जुळवल्यास आपल्या ‘महाराष्ट्रा’चा नकाशा बनणार आहे. या पाच शहरांमधील मॅरेथॉन जिंकून हे मेडल्स् पटकाविणारा धावपटू हा ‘महामॅरेथॉनर’ ठरणार आहे.

महामॅरेथॉनसाठी नोंदणीचा आज शेवट‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वासाठी धुमधडाक्यात नोंदणी सुरू झाली आहे. कोल्हापुरात गेल्या वर्षी ‘लोकमत महामॅरेथॉन’ला उदंड प्रतिसाद लाभला. आबालवृद्ध तंदुरुस्त राहावेत, या हेतूने यावर्षी आयोजित केलेली ही महामॅरेथॉन फन रन (१२ वर्षांपेक्षा जास्त धावण्याचा छंद असणाºयांसाठी), १० किलोमीटरची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ किलोमीटर (१८ पेक्षा जास्त) असणार आहे. त्यात फॅमिली रन तीन किलोमीटर अंतराची असणार आहे. ती सर्वच वयोगटांसाठी खुली असणार आहे. त्याचप्रमाणे लष्कर, पोलीस दलातील धावपटूंसाठी वेगळा गट ठेवला आहे. विदेशातील स्पर्धकांनाही या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. या मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत आज, दि. २० डिसेंबरपर्यंत आहे.नावनोंदणीसाठी संपर्कया महामॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर, मोबाईल नंबर (रोहन भोसले) ९६०४६४४४९४, ९८८१८६७६०० वर नोंदणी करता येणार आहे. 

 

टॅग्स :Lokmat Kolhapur Maha Marathonलोकमत कोल्हापूर महामॅरेथॉनkolhapurकोल्हापूर