शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: जोतिबा डोंगरावर दुसऱ्या खेट्यासाठी भाविकांची झुंबड, चैत्र यात्रा कधी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 12:03 IST

जोतिबा : श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर दुसरा रविवार खेटा धार्मिक वातावरणात पार पडला. दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची झुंबड उडाली होती. चांगभलंच्या ...

जोतिबा : श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर दुसरा रविवार खेटा धार्मिक वातावरणात पार पडला. दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची झुंबड उडाली होती. चांगभलंच्या गजराने अवघी दख्खननगरी दुमदुमून गेली होती.कोल्हापूर, वडणगे, निगवे, कुशिरे गायमुख तीर्थमार्गे पायी चालत खेटेकरी भाविक जोतिबा मंदिरात दाखल झाले. चांगभलंचा गजर करीत भाविकांनी दर्शन घेतले. चालत आलेल्या भाविकांना सेवाभावी संस्था मंडळे यांनी प्रसाद वाटप केला. सकाळी ९ वाजता पंचामृत अभिषेक झाला. मुख्य पुजारी यांच्या हस्ते अभिषेक झाला. जोतिबाची अलंकारीत खडी महापूजा बांधली. सकाळी ११ वाजता उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवकांच्या लवाजम्यासह मंदिर प्रदक्षिणेसाठी धुपारती सोहळा निघाला. भाविकांनी गुलाल, खोबऱ्यांची उधळण करीत धुपारतीचे दर्शन घेतले. दुसऱ्या खेट्याला भाविकामुळे मंदिराबाहेर दर्शन रांगा लागल्या होत्या. दर्शन रांगेवर नियंत्रणासाठी देवस्थान समितीचे प्रभारी दीपक म्हेत्तर, कोडोली पोलिस स्टेशनचे सपोनि शीतलकुमार डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी तैनात होते. दर्शन रांग व्यवस्थेसाठी गावकर, पुजारी समिती, स्वयंसेवक हजर होते. खाजगी वाहनातून भाविक जोतिबा डोंगरावर येत होते. रात्री ८ वाजता श्री जोतिबा देवाचा पालखी सोहळा निघाला. त्यात गुलाल, खोबऱ्यांची उधळण झाली.५ एप्रिलला चैत्र यात्रा ५ एप्रिलला चैत्र यात्रा होणार असून, यात्रेची नियोजन बैठक १ मार्चला पन्हाळचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली जोतिबा डोंगरावर होणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा