शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक आघाड्यांचेच ८७ गावांत सरपंच सहा तालुक्यांतील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 14:11 IST

Sarpanch Grampanchyat Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील २३८ गावांतील सरपंचपदाच्या गुरुवारी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे ८७ गावांत स्थानिक आघाड्यांचे सरपंच झाले. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व जनसुराज्य शक्ती पक्षांनेही घवघवीत यश मिळविले.

ठळक मुद्दे स्थानिक आघाड्यांचेच ८७ गावांत सरपंच सहा तालुक्यांतील चित्र राष्ट्रवादी, शिवसेनेसह जनसुराज्यला चांगले यश

कोल्हापूर : जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील २३८ गावांतील सरपंचपदाच्या गुरुवारी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे ८७ गावांत स्थानिक आघाड्यांचे सरपंच झाले. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व जनसुराज्य शक्ती पक्षांनेही घवघवीत यश मिळविले.

अनेक उलथापालथी, सदस्य फोडाफोडी, इर्षेमुळे या निवडी अत्यंत चुरशीने झाल्या. निवडीनंतर गावे गुलालाने न्हावून निघाली. या निवडीचे बरेवाईट परिणाम पुढील कांही महिने गावोगावी अनुभवायला येणार आहेत.या सहा तालुक्यातील कांही गावांतील सरपंच आरक्षणास न्यायालयात आव्हान दिल्याने सरपंच निवडी लांबणीवर पडल्या होत्या. भुदरगड तालुक्यातील ४५ पैकी १८ गावांतील सरपंच निवडी गुरुवारी झाल्या. उर्वरित २७ गावातील निवडी आज शुक्रवारी होत आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी या निवडणुका सत्तेतील शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्रित विरुद्ध भाजप अशा फारशा झाल्या नव्हत्या. गावनिहाय गटातटाचे सोयीचे राजकारण पाहून स्थानिक आघाड्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकत्र आल्या होत्या. त्यामुळे त्याचेच प्रतिबिंब सरपंच निवडीत पडल्याचे दिसत आहे.

लोकमतने २३८ गावांतील पक्षनिहाय संख्याबळ देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यात पुरेशी स्पष्टता नाही. कारण हे एकाच पक्षाचे यश नाही. सरपंच एका पक्षाचा झाला असला तरी गावांत सत्ता अनेक पक्षांच्या स्थानिक गटांनी एकत्रित येऊन जिंकली असल्याने एकाच पक्षाची सत्ता आली असे म्हणणे धाडसाचे आहे. एकाच पक्षाची व स्पष्ट बहुमत मिळालेली गांवे फारच कमी आहेत. त्यामुळे पक्ष, नेते व गटांनी सरपंच आपलाच असा दावा केला आहे.सरपंचपदाचे तुकडेकाही गावांत स्थानिक आघाडीतील सर्व गटांना सामावून घेण्यासाठी कोल्हापूर महापालिकेतील तीन महिन्यांच्या महापौरसारखे सरपंचपदही वर्षाला वाटून घेण्यात आले आहे. पाच वर्षात कोण कोणत्या वर्षी सरपंच होणार हे निश्चित झाल्यावरच काही गावांत निवडी बिनविरोध झाल्या आहेत.नाराजी अशीही...शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथे सरपंच आपल्या गटाचा झाला नसल्याच्या नाराजीतून सात सदस्यांनी लगेच राजीनामा दिला आहे.सरपंच पद रिक्तगडहिंग्लज तालुक्यातील आरळगुंडी येथे अनुसूचित जमाती या प्रवर्गातील महिला सदस्या नसल्याने सरपंचपद रिक्त राहिले.दावेच जास्त..सगळ्यात जास्त संभ्रम शिरोळ तालुक्यात राहिला. त्या तालुक्यात एकूण ३३ गावांत सरपंच निवडी होत्या, परंतु आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी २२, काँग्रेसच्या गणपतराव पाटील गटाने १५, माजी आमदार उल्हास पाटील यांनी १२ गावांत आपलेच सरपंच झाल्याचा दावा केला आही. सरपंच ३३ व दावे केलेली गावे ५० असे चित्र तिथे तयार झाले आहे.पन्हाळ्यात जनसुराज्य..आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाने पन्हाळा तालुक्यात चांगले यश मिळविले. काही गावांत त्यांना अमर पाटील गटाची मदत झाली. शाहूवाडीत जनसुराज्यला काँग्रेसच्या करणसिंह गायकवाड गटाची ताकद मिळाली.

  • एकूण सरपंच निवडी : २३८
  • स्थानिक आघाडी : ८७
  • राष्ट्रवादी काँग्रेस : ३६
  • शिवसेना : ३५
  • जनसुराज्य शक्ती : ३७
  • जनसुराज्य-काँग्रेस आघाडी : १२
  • काँग्रेस : २०
  • भाजप : ०८
  • जद : ०२
  • रिक्त : ०१
टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूर