शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

पेठांच्या दाट वस्तीत सामान्य, नोकरदार वर्गच निर्णयक

By admin | Updated: October 8, 2014 21:48 IST

पुनर्रचनेचा फायदा शिवसेनेलाच : आदेश न जुमानता स्वत:ला पटेल त्यालाच मतदान करण्याचे कौशल्य

भारत चव्हाण -कोल्हापूर -पुरोगामित्वाचा चेहरा असणाऱ्या या मतदारसंघात एकीकडे झोपडपट्टीसारखा भाग, तर दुसरीकडे बंगले, कॉलनीसारखा पॉश भाग. एकीकडे सुशिक्षित, तर दुसरीकडे अशिक्षित मतदार. एकीकडे कष्टकऱ्यांची संख्या अधिक, तर दुसरीकडे व्यापारी, उद्योजक, कारखानदार, नोकरदारांचाही रहिवास असा इतिहास-भूगोल असलेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर विजयासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. काँग्रेसचे दोन अपवाद वगळता १९५७ पासून शेकाप, संयुक्त महाराष्ट्र समिती, जनता पक्ष, शिवसेना अशा विरोधी पक्षांचे उमेदवार येथून विजयी झाले आहेत.या मतदारसंघाची २००९ मध्ये पुनर्रचना झाली. शहराच्या अग्नेय दिशेपासून पश्चिम भागातील २६ प्रभाग हे कोल्हापूर दक्षिण भागाला जोडले गेले, तर पूर्वीचा करवीर मतदारसंघातील कसबा बावडा, कदमवाडी, भोसलेवाडी, राजारामपुरी, शाहूपुरी हा भाग कोल्हापूर उत्तर मतदारसंघाला जोडण्यात आला आहे. पुनर्रचित मतदारसंघाचा खरा फायदा शिवसेनेला झाला. मतदारसंघ शहरी असल्याने कोणी आदेश दिला तरी जे स्वत:ला पटते तेच मतदार करत असतात. महापालिकेत जरी काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असली आणि या पक्षाच्या नेत्यांनी काही विकासाभिमुख योजना शहरात आणल्या असल्या तरीही टोल, एलबीटीच्या मुद्द्यावर नाराज आहे. निकाल फिरवणारा भागउत्तर मतदारसंघात कसबा बावडा, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ या भागात दाटवस्तीने लोक राहत असल्यामुळे हा भागच उमेदवाराला विजयाचा गुलाल लावत आला आहे. गत निवडणुकीत या भागांतील मतदारांनी शिवसेनेची पाठराखण केली, तर लोकसभेवेळी राष्ट्रवादीला मदत केली. त्यामुळे येथे धडक मारण्याचा सर्वांचा प्रयत्न आहे. मराठा समाजाचे अंदाजे मतदान १ ते १ लाख १० हजारमुस्लिम समाजाचे अंदाजे मतदान ३० ते ३२ हजार दलित समाजाचे मतदान २२ ते २५ हजारब्राह्मण समाजाचे मतदान १८ ते २० हजारगुजराती व राजस्थानी मतदान १७ ते १८ हजार इतर ओबीसी मतदान अंदाजे ६० ते ६५ हजार