शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या बाप्पांचे धुमधडाक्यात होणार आगमन, साऊंड सिस्टिमला ही मिळाली परवानगी; पण..

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: August 30, 2022 16:41 IST

तरुण मंडळाकडून बाप्पांच्या आगमनासाठी जय्यत तयारी

कोल्हापूर: कोरोना महामारीनंतर तीन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. उद्या, बुधवारी घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. तर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव होत असल्याने तरुण मंडळाकडून बाप्पांच्या आगमनासाठी जय्यत तयारी केली आहे. यातच तरुण मंडळांनी जिल्हा प्रशासनाकडे साऊंड सिस्टिमला देखील परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. या मागणीचा विचार करुन जिल्हा प्रशासनाने ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश दिले. त्यामुळे मोठ्या धुमधडाक्यात गणरायाचे आगमन होणार आहे.सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबत 14 सुटीचे दिवस यापूर्वी घोषीत करण्यात आले आहेत. तसेच उर्वरीत एक दिवस आवश्यकतेनुसार महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात आला असून यानुसार ही सुट देण्यात आली आहे.साऊंड सिस्टिमचा वापर श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासुन रात्री 12 वाजेपर्यंत करता येईल. यासाठी पोलीस विभागाची पुर्व परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. तर, जिल्ह्यासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबत घोषीत करण्यात आलेल्या 14 सुटीच्या दिवसात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.बाजारपेठेला उधाण.. रस्ते झाले पॅकउत्सवाला फक्त एक दिवस राहिल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी जणू अख्खे कोल्हापूर रस्त्यावर आले आहे. शहरातील महापालिकेमागील कटलरी मार्केट, पापाची तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, राजारामपुरी अशा प्रमुख बाजारपेठांमध्ये आरासाच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली आहे. पान, फळं, फुलांच्या माळा, तोरण, विद्युत रोषणाई, मखर, फुलदाणी अशा अनेक आकर्षक साहित्य मन मोहून घेत आहे. उत्सवाच्या तयारीसाठी शहर रस्त्यावर आल्याने प्रत्येक चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे.घरोघरी लगबगबाप्पांच्या आगमनाला आता एक दिवस राहिल्याने घरोघरी उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. घरादाराची साफसफाई, गेल्यावर्षी माळावर काढून ठेवलेले सजावटीचे साहित्य काढणे, ते सुस्थितीत आहेत का बघणे, नव्या साहित्यांची यादी, विद्युत रोषणाईसाठीच्या माळांची जोडणी, यावर्षी कोणती आरास करायची, काय थीम ठेवायची याचा विचार करून सजावट केली जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanesh Mahotsavगणेशोत्सव